वेतनासाठी उत्पन्न राखून ठेवण्याच्या एसटीच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2019 12:21 AM2019-12-19T00:21:48+5:302019-12-19T00:23:47+5:30

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन टप्प्याटप्प्याने देण्यात आल्याचा प्रसंग एस.टीच्या इतिहासात प्रथमच घडल्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आता आगाराच्या वेतनासाठी दहा दिवसांचे उत्पन्न राखून ठेवण्याचे आणि सदर निधी बॅँकेत ठेवण्याचे आदेश एस.टी. महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.

 ST's Tips on Maintaining Income for Salary | वेतनासाठी उत्पन्न राखून ठेवण्याच्या एसटीच्या सूचना

वेतनासाठी उत्पन्न राखून ठेवण्याच्या एसटीच्या सूचना

Next

नाशिक : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन टप्प्याटप्प्याने देण्यात आल्याचा प्रसंग एस.टीच्या इतिहासात प्रथमच घडल्यानंतर पुन्हा अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी आता आगाराच्या वेतनासाठी दहा दिवसांचे उत्पन्न राखून ठेवण्याचे आणि सदर निधी बॅँकेत ठेवण्याचे आदेश एस.टी. महामंडळाच्या वित्तीय सल्लागार व मुख्य लेखाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत.
राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातील कर्मचाºयांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन शंभर टक्के न करता पहिल्या टप्प्यात टक्के वेतन अदा करण्यात आले होते. केवळ ८१ टक्के वेतन अदा करण्यात येऊन उर्वरित १९ टक्के वेतन देण्यासंदर्भात निर्णय नंतर कळविण्यात आले होते.
यामुळे महामंडळातील कर्मचाºयांमध्ये तीव्र नाराजी पसरली होती. अनेक संघटनांनीदेखील महामंडळाच्या आर्थिक तोट्याला महामंडळातील नियोजनशून्य कारभार जबाबदार असल्याचा आरोप केला होता. महामंडळातील खासगीकरण धोरणावरही कर्मचाºयांनी टीका केली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या कारभाराविषयी चौफेर वादळ उठले होते. कर्मचाºयांच्या वेतनानंतर डेपोतील डिझेलसाठीदेखील पैसे नसल्याने दोन दिवसांपासून बससेवा विस्कळीत झाली, तर अनेक चालक वाहकांना सक्तीची रजा देण्यात आली होती. अजूनही डिझेलबाबतची अनिश्चितता कायम आहे. या सर्व प्रकारानंतर आता महामंडळाने तोडगा काढला असून, डेपो स्तरावरच कर्मचाºयांचे वेतन करण्यासाठी रोजच्या उत्पन्नामधून काही उत्पन्न राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कर्मचाºयांना वेळेत वेतन मिळावे म्हणून आगारातील दैनंदिन महसूल दरमहा दि.१ ते ४ या कालावधीमध्ये राखून ठेवण्याबात सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार उत्पन्न राखून ठेवले जात असेल तर उत्पन्नाच्या आगारातील कर्मचाºयांचे वेतन पूर्णपणे अदा होत नसल्यामुळे आता यापुढे आगारातील वेतनासाठी महिन्याच्या २७ आणि २८ तारखेपासून ज्या महिन्यात वेतन अदा करावयाचे आहे त्या महिन्याच्या ६ तारखेपर्यंत कर्मचाºयांच्या वेतनासाठी उत्पन्न बॅँकेमार्फत राखीव ठेवण्यात येऊन महिन्याच्या ७ तारखेला सर्व कर्मचाºयांचे संपूर्ण वेतन आपल्या स्तरावर अदा करण्याच्या सूचना महामंडळाच्या वित्तीय सल्लागार विभागाने दिलेल्या आहेत.
तीन दिवसांपासून ‘ड्यूट्या’ रद्द
नाशिक विभागात डिझेलचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे चालक वाहकांच्या ड्यूट्या रद्द करण्यात आल्याची चर्चा असतानाही वाहतूक विभागाने मात्र असा कोणताही प्रकार आणि प्रवाशांच्या तक्रारी नसल्याची भूमिका घेतली आहे. गेल्या तीन दिवसांच्या चालक-वाहक रिपोर्टमध्ये मात्र अनेक कर्मचाºयांच्या ड्यूट्या रद्द केल्याचे तसेच काही कर्मचाºयांची सुटी दाखविण्यात आली आहे. अनेक चालक-वाहक हे ड्यूटीवर असतानाही त्यांची रजा दाखविण्यात आल्याचे कर्मचाºयांचे म्हणणे आहे. तर प्रवाशांना तक्रारीसाठी तक्रार पुस्तकच नसल्याने प्रवासी तक्रार करणार कुठे?

Web Title:  ST's Tips on Maintaining Income for Salary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.