मालट्रकची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 01:10 IST2018-12-16T01:10:37+5:302018-12-16T01:10:50+5:30

दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर शनिवारी (दि़ १५)पहाटेच्या सुमारास भरधाव मालट्रक व पिकअप यांच्यात अपघात होऊन पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली़

Struggling to catch the truck; The driver seriously injured | मालट्रकची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी

मालट्रकची पिकअपला धडक; चालक गंभीर जखमी

पंचवटी : दिंडोरीरोडवरील तारवालानगर चौफुलीवर शनिवारी (दि़ १५)पहाटेच्या सुमारास भरधाव मालट्रक व पिकअप यांच्यात अपघात होऊन पिकअप चालक गंभीर जखमी झाल्याची घटना घडली़
या अपघातानंतर मालट्रक व पिकअप ही दोन्ही वाहने रस्त्यावर उलटली. पहाटेच्या सुमारास या मुख्य रस्त्यावर वर्दळ कमी असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली़ तारवालानगर चौफुलीवर वारंवार अपघात घडत असल्याने आता तरी तातडीने गतिरोधक टाकण्याची मागणी होत आहे.
शनिवारी पहाटे पावणेतीन वाजेच्या सुमारास तारवालानगर ते पेठरोड लिंक रस्त्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या मालट्रकने दिंडोरीकडून नाशिककडे जाणाºया पिकअपला जबर धडक दिली़ या धडकेनंतर पिकअप व मालट्रक ही दोन्ही वाहने रस्त्यावरच उलटली़ यामध्ये पिकअपचालक गंभीर जखमी झाला.

Web Title: Struggling to catch the truck; The driver seriously injured