जिल्हा न्यायालयातील वकील सोसायटीमध्ये सरळ लढत

By Admin | Updated: September 4, 2015 23:57 IST2015-09-04T23:57:15+5:302015-09-04T23:57:46+5:30

जिल्हा न्यायालयातील वकील सोसायटीमध्ये सरळ लढत

A straight fight in a lawyer in the District Court | जिल्हा न्यायालयातील वकील सोसायटीमध्ये सरळ लढत

जिल्हा न्यायालयातील वकील सोसायटीमध्ये सरळ लढत

नाशिक : नाशिक जिल्हा अ‍ॅडव्होकेट मल्टिपर्पज सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, १३ संचालकांसाठी परिवर्तन पॅनल व आपला पॅनल अशी दुरंगी लढत होणार आहे़ १५ सप्टेंबरला यासाठी मतदान होणार असून, यामध्ये जिल्ह्यातील २००४ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे़ दरम्यान, गुरुवारी (दि़३) अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी सर्वसाधारण गटातील सात, इतर मागास वर्ग गटातून पाच व महिला गटातून एक अशा १३ उमेदवारांनी माघार घेतली़
अ‍ॅड़ शिवाजी जाधव, अ‍ॅड़सीताराम जाधव, अ‍ॅड़चंद्रकांत येवले, अ‍ॅड़ अरुण माळोदे यांच्या नेतृत्वाखाली परिवर्तन पॅनल तयार करण्यात आले असून, ते मशाल या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत़, तर अ‍ॅड़ प्रभाकर खराटे यांच्या नेतृत्वाखाली आपला पॅनल निवडणूक रिंगणात उतरले असून, ते रोडरोलर या चिन्हावर निवडणूक लढवित आहेत़ दोन्ही पॅनलतर्फे शुक्रवारी (दि़४) निवडणूक प्रचाराचा शुभारंभ केला जाणार आहे़
या निवडणुकीसाठी जिल्हा न्यायालय, नाशिकरोड न्यायालय यांसह तालुका न्यायालयातील सुमारे २००४ मतदार या निवडणुकीसाठी मतदान करणार आहेत़ येत्या १५ सप्टेंबरला जिल्हा न्यायालयात मतदानप्रक्रिया पार पडणार
आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: A straight fight in a lawyer in the District Court