शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

धान्यपुरवठा होणार ठप्प

By admin | Updated: July 30, 2016 00:23 IST

संघटना : उचल व वितरण न करण्याचे आवाहन

येवला : शासन परवानाधारकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असून, मागण्या मान्य करीत नसल्याने आॅल महाराष्ट्र फेअर प्राईज शॉपिकपर्स फेडरेशन, पुणे यांनी १ आॅगस्टपासून परवानाधारकांनी बेमुदत धान्य व केरोसिनची उचल व वितरण करू नये, असे आवाहन करीत घेतलेल्या निर्णयानुसार येवला तालुका व शहर रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवानाधारक संघटनेच्या वतीने त्यास पाठिंबा देऊन १ आॅगस्टपासून बेमुदत संपावर जात आहे. तसे निवेदन तहसीलदार शरद मंडलिक यांना देण्यात आले.स्वस्त धान्य दुकानदार व किरकोळ केरोसीन परवानाधारक आजतागायत शासनाने वेळोवेळी ठरविलेल्या धोरणात्मक निर्णयानुसार सर्व योजनाअंतर्गत शहर व तालुक्यातील शिधापत्रिकाधारकांना धान्य व केरोसीनची वितरण व्यवस्थेतून सेवा करीत आहेत.परवानाधारकांच्या कुटुंबाचे उदरिनर्वाह होईल अशा पद्धतीने त्यांना कमिशन द्यावे, अथवा त्यांना मासिक ३५ हजार इतके मानधन देण्यात यावे. केरासीन परवानाधारक हा पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. परवानाधारकांचे संपूर्ण ग्रामीण शालेय पोषण आहार व इतर प्रलंबित देयके सरकारने त्वरित अदा करावीत तसेच परवानाधारकांना शासकीय कामाची सक्ती नसावी. शासनाने परवानाधारकांना माल हमालीसह दुकान पोहोच द्यावा, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदन देताना येवला तालुका व शहर रास्तभाव दुकानदार व केरोसीन परवाना संघटनेचे अध्यक्ष बाबुलाल कासलीवाल, उपाध्यक्ष अमृता शिंदे, किशोर काळे, राजेंद्र घोडके, खजिनदार मुकुंद कासार, दगू साठे, भास्कर कोंढरे, दिलीप दिवटे, नारायण गुंजाळ, सुरेंद्र वडे, भगवान शिंदे, सुनीता कानडे, आबासाहेब भंडारे, मच्छिंद्र पवार, एम. के. गायकवाड, एन. बी. शेख, जी. एन. चव्हाण, जी. के. साबळे, के. बी. सावंत आदी उपस्थित होते. (वार्ताहर)