शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

थर्मल पॉवर स्टेशन वाचविण्याचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:43 IST

महावितरणकडून कारवाई सुरू नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या वीजवितरण कंपनीने आता उत्पन्नवाढीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार आता थकबाकी ...

महावितरणकडून कारवाई सुरू

नाशिक : आर्थिक संकटात सापडलेल्या वीजवितरण कंपनीने आता उत्पन्नवाढीचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानुसार आता थकबाकी वसूल करण्याबरोबरच वीज चोरांकडून वसुलीची मोहीम सुरू करण्यात आली आहे. नाशिक शहर तसेच जिल्ह्यामध्ये चोरांवर कारवाई आणि दंडात्मक कारवाई केली जात आहे.

प्रेरणा सांस्कृतिक मंडळातर्फे आदरांजली

नाशिक : प्रेरणा सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळाच्या वतीने महात्मा गांधी यांना पुण्यतिथीनिमित्त आदारांजलीअर्पण करण्यात आली. यावेळी राजेंद्र बागुल यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनावर विचार मांडले. देशाला महात्मा गांधी यांच्या विचारांची गरज असून याच विचारांवर युवकांनी चालले पाहिजे, असे बागुल म्हणाले. यावेळी ज्ञानेश्वर काळे, वसंत मनियार, सतीश बागुल, अशोकभाई कांबळे, आफताब सय्यद, मुख्तार सय्यद आदींसह स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी उपस्थित होते. (फोटो)

जिल्हा रुग्णालय पतसंस्था कार्यालयाचे उद‌्घाटन

नाशिक : जिल्हा रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था या संस्थेच्या नूतन वास्तूचे उद‌्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी भाऊसाहेब खताळ होते. प्रास्ताविक ज्ञानेश्वर माळोदे यांनी केले. अजित गायकवाड, चेअरमन देवीदास सहाणे यांनी संस्थेची माहिती दिली. याप्रसंगी पंकज सूर्यवंशी, प्रकाश राव, किशोर पगारे, आनंद सपकाळ, दिलीप बोढारे, वसंत कांबळे, अनंत कुलकर्णी, पूनम धनवटे, संजय ठोंबरे आदी उपस्थित होते. आभार सुनील गिते यांनी मानले.

मसापला ज्येष्ठ रंगकर्मींच्या प्रतिमा भेट

नाशिक : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेला ज्येष्ठ नाट्य समीक्षक चारुदत्त दीक्षित यांनी ज्येष्ठ रंगकर्मी दत्ता भट व बाबूराव सावंत यांच्या प्रतिमा भेट दिल्या. नाट्य परिषदेचे अध्यक्ष रवींद्र कदम, कार्यवाह सुनील ढगे यांच्याकडे या प्रतिमा सुपुर्द करण्यात आल्या. नाट्य परिषदेच्या हॉलमध्ये या छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालरंगभूमीचे प्रमुख कार्यवाह आनंद जाधव, खजिनदार प्रतीक विसपुते, गायिका सोनल अधिकारी, सोनाली चौधरी, दीपक दीक्षित, सुधीर करंजीकर आदी उपस्थित हाेते.

नवीन रिक्षा परवाने बंदची मागणी

नाशिक : राज्य सरकारने २०१७ मध्ये नवीन मुक्त रिक्षा परवाने सुरू केले असल्याने अशाप्रकारचे परवाने देणे बंद करावे, अशी मागणी भद्रकाली ऑटो रिक्षा युनियनकडून करण्यात आली आहे. परवान्यांची संख्या मोठी झाली असून आगोदरच या व्यवसायात स्पर्धा वाढलेली आहे. खासगी प्रवासी सेवांमुळे रिक्षाचालकांना आर्थिक सामना करावा लागतो. त्यामुळे नवीन परवाने देण्यात येऊ नये, असे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आहे.