पोषण आहार नियमित मिळण्याबाबत निवेदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2020 01:18 IST2020-09-24T19:18:57+5:302020-09-25T01:18:30+5:30
नांदगाव : अंगणवाडीतून मिळणाऱ्या सुविधा व पोषण आहारात अनियमितता असल्याने लाभार्थींनी ते तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनंदा खैरनार यांना निवेदन सामाजिक कार्यकर्त्या अॅड. विद्या कसबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले.

बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनंदा खैरनार यांना निवेदन देताना विद्या कसबे, शबाना मन्सुरी, संगीता जगताप.
नांदगाव : अंगणवाडीतून मिळणाऱ्या सुविधा व पोषण आहारात अनियमितता असल्याने लाभार्थींनी ते तत्काळ उपलब्ध करून देण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी सुनंदा खैरनार यांना निवेदन सामाजिक कार्यकर्त्या अॅड. विद्या कसबे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने निवेदन दिले. यावेळी पोषण आहारा संदर्भात व अंगणवाडीद्वारे ज्या सुविधा आहेत त्या लवकरात लवकर मिळाव्यात याबाबत चर्चा झाली. तसेच नवीन अंगणवाडी मंजूर होईपर्यंत गरजूंना तात्पुरत्या स्वरूपातमध्ये पोषण आहार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू व लवकरात लवकर नवीन अंगणवाडीचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात येतील, असे आश्वासन खैरनार यांनी शिष्टमंडळास दिले. निवेदनावर यावेळी शबाना मन्सुरी, वंदना पांडे, नगरसेविका संगीता जगताप, गीता शिंदे आदींच्या स्वाक्षºया आहेत.