परराज्यात कांद्याला मागणी वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2019 00:23 IST2019-05-30T00:03:50+5:302019-05-30T00:23:21+5:30
परराज्यात व परदेशात कांद्याला मागणी वाढल्याने कांदा खरेदी विक्र ी ची अर्थप्रणाली गतिमान झाली आहे. वणीच्या उपबाजारात बुधवारी ५४१ वाहनांमधून सुमारे बारा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.

परराज्यात कांद्याला मागणी वाढली
वणी : परराज्यात व परदेशात कांद्याला मागणी वाढल्याने कांदा खरेदी विक्र ी ची अर्थप्रणाली गतिमान झाली आहे. वणीच्या उपबाजारात बुधवारी ५४१ वाहनांमधून सुमारे बारा हजार क्विंटल कांद्याची आवक झाली.
कमाल १३३६, किमान ६०० तर सरासरी १०६० रु पये क्विंटल दराने कांद्याचे व्यवहार पार पडले. केरळ, बेंगलोर या दाक्षिणात्य भागात महाराष्ट्राच्या कांद्याला मागणी वाढली आहे. तर मलेशिया, दुबई , कोलंबो, सिंगापुर या परदेशातही मागाणी वाढली आहे. सध्या ईदनिमीत्त कांदा खरेदी विक्र ीच्या व्यवहार प्रणालीत गतिमानता आली असुन महाराष्ट्रातून सुमारे १०० कंटेनर कांदा प्रतिदीन परदेशात निर्यात होत असल्याची माहिती निर्यातदार मनिष बोरा यांनी दिली. दरम्यान टिकवण क्षमता व साठवणूकसाठी योग्य असा गुणधर्म असलेल्या उन्हाळ कांद्याचे दर अजून वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत असुन बहुतांशी उत्पादकांनी भविष्यातील दरवाढीचे आडाखे बांधून कांदा साठवणुकीस अग्रक्रम दिला आहे.