शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

राज्य शासनाच्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

By admin | Updated: September 4, 2016 01:40 IST

नाशिकच्या देवेंद्र पाटील, गवळे, महाले, महाजन यांचा समावेश

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने दरवर्षी देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली असून, त्यात नाशिकच्या चार शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाले आहेत. विभागातून देण्यात येणारा सावित्रीबाई आदर्श शिक्षिका पुरस्कार जळगावच्या वंदना भगवानराव ठेंग यांना जाहीर झाल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांनी दिली.शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने यासंदर्भात शनिवारी (दि.३) एक परिपत्रक काढून पुरस्कारार्थी शिक्षकांची नावे जाहीर केली आहेत. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग स्तरावरून सन २०१५-१६ राज्य शिक्षक पुरस्कारासाठी देण्यात येणाऱ्या प्राथमिक शिक्षकांमध्ये ३८ जिल्ह्यांतील ३८ प्राथमिक शिक्षकांची निवड करण्यात आली आहे. त्यात नाशिक तालुक्यातील पिंपळद येथील जिल्हा परिषदेचे प्राथमिक सहायक शिक्षक विलास जगन्नाथ गवळे यांना जाहीर झाला आहे. तसेच माध्यमिक शिक्षकांना देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारांसाठी ३९ माध्यमिक शिक्षकांची निवड करण्यात आली असून, त्यात नाशिक जिल्ह्णातून डी. आर. भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, देवगाव (निफाड) शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब कारभारी महाले यांना जाहीर झाला आहे. त्याचप्रमाणे आदिवासी क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते जिल्हा परिषदेचे सहायक शिक्षक देवेंद्र तानाजी पाटील यांना जाहीर झाला आहे. देवेंद्र पाटील यांना मागील वर्षी जिल्हा परिषदेच्या वतीने आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कारांमध्ये नाशिक विभागातून पिंगळवाडे (जळगाव) येथील जिल्ह परिषद शाळेच्या सहायक शिक्षक वंदना भगवानराव ठेंग यांना पुरस्कार जाहीर झाला आहे. (प्रतिनिधी)