नाशिक शहरात राजकिय फलक हटवण्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 16:53 IST2019-09-21T16:51:56+5:302019-09-21T16:53:54+5:30
नाशिक- विधानसभा निवडणूकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झााली असून लगोलग त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.२१) दुपारीच नाशिक शहरातील नाशिक शहरातील राजकिय फलक हटविण्यास प्रारंभ झाला असून महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने देखील जमा करण्यात आली आहेत.

नाशिक शहरात राजकिय फलक हटवण्यास प्रारंभ
नाशिक- विधानसभा निवडणूकांची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू झााली असून लगोलग त्यांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. शनिवारी (दि.२१) दुपारीच नाशिक शहरातील नाशिक शहरातील राजकिय फलक हटविण्यास प्रारंभ झाला असून महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांची वाहने देखील जमा करण्यात आली आहेत.
कोणत्याही क्षणी विधानसभा निवडणूका जाहिर होतील आणि आचारसंहिता लागु होणार असल्याने त्यादृष्टीने देखील महापालिकेत आणि जिल्हा परिषदेत देखील अनेक निर्णय अगोदरच घेण्यात आले आहेत. त्यानंतर देखील आचारसंहितेची धापवळ सुरू होती. दरम्यान, दुपारी राज्य निवडणूक आयोगाने विधान सभा निवडणूकीची तारीख घोषित केली त्यानंतर आचारसंहिता लागु झाली. त्यामुळे शहरातील राजकिय पक्षांचे फलक हटविण्यास प्रारंभ झाला.
निवडणूकीच्या तोंडावर राजकिय पक्षांनी मोठ्या प्रमाणावर फलक लावले होते. राष्टÑवादी कॉँग्रेसचे नेते शरद पवार यांच्या नुकत्याच झालेल्या दौºयामुळे पक्षाचे झेडे चौकाचौकात लागले होते तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेला समारोप यामुळे देखील भाजपा कार्यकर्त्यांची फलकबाजी वाढली होती. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने शनिवारी (दि.२१) दिवसभर सर्व विभागातून बॅनर्स आणि फलक जमा केले. त्याच बरोबर पदाधिकाºयांच्या मोटारी देखील जमा केल्या.