शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

ओझरच्या खंडेराव महाराज यात्रेस गुरूवारपासून प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 13:15 IST

ओझर : चंपाषष्ठीला ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेला आज (दि.१३) पासून प्रारंभ होत आहे.नाशिक जिल्ह्यातील ओझर गावाला लाभलेले वरदान म्हणजे येथील खंडेराव महाराज मंदिर. जेजुरीनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणजे ओझरची यात्रा अशी ओळख पूर्वीपासून लाभलेली आहे.

ओझर : चंपाषष्ठीला ओझर येथील खंडेराव महाराज यात्रेला आज (दि.१३) पासून प्रारंभ होत आहे.नाशिक जिल्ह्यातील ओझर गावाला लाभलेले वरदान म्हणजे येथील खंडेराव महाराज मंदिर. जेजुरीनंतर सर्वात मोठी यात्रा म्हणजे ओझरची यात्रा अशी ओळख पूर्वीपासून लाभलेली आहे. यानिमित्त हजारोंच्या संख्येने भाविक या मध्ये सहभागी होतात. सत्वाचा मल्हारी म्हणून पंचक्र ोशीत त्याची ओळख आहे. या खंडेरायाची यात्रा तब्बल पाच दिवस भरते. गुुुुरूवार दि.१३ तारखेपासून यात्रेला प्रारंभ होणार असून या यात्रेचे विशिष्ट म्हणजे यात्रेचे द्वादश मल्हाररथ ओढण्यासाठी येथे देवाचा अश्व स्वत:हून येत असल्याची आख्यायिका आहे. अश्वमिरवणुकीसोबतच देवाची पहिली पालखी निघते. देवदासींचे नृत्य, गोंधळ्यांची गीते, रणशिंगांचा नाद, सोबत यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमून जाते. यात्रेच्या पिहल्या दिवशी आख्खं गाव पिवळं होतं. हवेत भंडारा उधळला जातो. बाणगंगेतून दर्शन करून अश्व पुढे जातो. खंडेराव महाराजांचा जयघोष होतो व मल्हाररथ अश्वाच्या मदतीने मैदानावर पळविला जातो. कै. विष्णुपंत पगारांचा मानाचा मोंढा गाडा, सोनेवाडी, शेजवळवाडी, मधला माळीवाडा, सिन्नरकर - निंबाळकर- चौधरी, समस्त पगार, गवळी, रास्कर, भडके, वरचा माळीवाडा, भडके कदम व इतर बारा बलुतेदार शिंदे-चौधरी व अण्णा भडके यांचे बैलगाडी अशा बारा गाडयांना देवाचा हा वारू जोडुन गोरज मुहुर्तावर तो हे बारा गाडे ओढून खऱ्या अर्थाने यात्रेला सुरूवात होते. ही ईश्वरी अनुभुती व हा थरार अनुभवण्यासाठी त्यावेळी लाखों आबालवृध्द भाविक गर्दी करतात. भंडा-याची उधळण व सदानंदाचा येळकोट , येळकोट येळकोट जय मल्हार अशा मल्हाराच्या जय घोषाने अवघा परिसर दुमदुमतो. त्यानंतर दुसºया दिवशी सकाळी मंदिराच्या आवारात हजेरीचा कार्यक्र म होतो. यात तमाशातील कलावंत खंडेरायाची गाणी म्हणतात. त्याबदल्यात ग्रामस्थ त्यांना बिक्षसी देतात. हजेरीनंतर कुस्त्यांची दंगल होते.यंदा भव्य स्वरूपात कुस्त्यांचे आयोजन यात्रा कमिटी तर्फे करण्यात आले आहे. यात्रेच्या शेवटच्या दिवशी परंपरेनुसार संध्यासमयी देवांना पुन्हा पालखीत बसवून वाजत-गाजत आपापल्या स्थानी, मानकºयांच्या गृही विराजमान करण्यात येते. ग्रामपालिका प्रशासनाने तयारी पूर्ण केली असून यात्रेसाठी पोलिसांची विशेष कुमक तैनात केली आहे.यंदा सीसीटीव्हीची नजर देखील यात्रेवर असणार असून त्यामुळे अनुचित प्रकारावर आळा बसेल.अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या यात्रोत्सवामुळे ओझरवासीयांमध्ये उत्साह संचारला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक