ओझर : पिंपळगाव बाजार समितीच्या ओझर उपबाजारात चालू हंगामातील टमाटा लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आला.प्रारंभी टमाटा क्रेटचे विधिवत पूजन करण्यात आले. मुहूर्तावर ओझर येथील शेतकरी गणेश अशोक चौधरी यांचा टमाटा ५११ प्रती क्रेट या दराने खरेदी करण्यात आला.लिलाव शुभारंभाप्रसंगी सभापती दिलीप बनकर यांनी, पिंपळगाव बाजार समिती कांद्याबरोबरच टमाटा, डाळिंब व भाजीपाल्यासाठीही नावाजलेली बाजार समिती आहे. संपूर्ण नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यांतूनही शेतकरी आपला शेतमाल मोठ्या प्रमाणात बाजार समितीत घेऊन येतात, असे सांगितले. व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळवून द्यावा, शेतमाल विक्रीप्रसंगी शेतकऱ्यांना अडचणी येत असतील तर थेट संपर्क साधण्याचे आवाहन आमदार बनकर यांनी केले. उपबाजारात सुरू असलेल्या लिलाव पद्धतीची सभापती आमदार बनकर उपसभापती दीपक बोरस्ते यांनी पाहणी केली. याप्रसंगी उपसभापती दीपक बोरस्ते, संचालक नंदकुमार सांगळे, ओझरचे माजी सरपंच राजेंद्र शिंदे, वसंत गवळी दिलीप कदम, भारत पगार, धोंडीराम पगार, विजय शिंदे ,नवनाथ मंडलिक, रवी भटड, अरुण पवार, रउफ पटेल, संदीप अक्कर आदींसह शेतकरी व्यापारी बांधव उपस्थित होते.
ओझर उपबाजार आवारात टमाटा लिलावास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2021 23:22 IST
ओझर : पिंपळगाव बाजार समितीच्या ओझर उपबाजारात चालू हंगामातील टमाटा लिलावाचा शुभारंभ बाजार समितीचे सभापती आमदार दिलीप बनकर यांच्या हस्ते करण्यात आला.
ओझर उपबाजार आवारात टमाटा लिलावास प्रारंभ
ठळक मुद्देप्रारंभी टमाटा क्रेटचे विधिवत पूजन करण्यात आले.