स्थायीचा निर्णय : मनपाची बदनामी केल्याचा आरोप

By Admin | Updated: September 1, 2016 00:50 IST2016-09-01T00:49:57+5:302016-09-01T00:50:08+5:30

वॉटरग्रेस कंपनीवर मानहानीचा दावा

Standing decision: The allegation of Nanda being defamed | स्थायीचा निर्णय : मनपाची बदनामी केल्याचा आरोप

स्थायीचा निर्णय : मनपाची बदनामी केल्याचा आरोप

नाशिक : घंटागाडीचा ठेका मंजूर करताना स्थायी समितीचे सभापती सलीम शेख यांनी काळ्या यादीत टाकण्यात आलेला ठेकेदार वॉटरग्रेस प्रॉडक्ट्स कंपनीवर महापालिकेची बदनामी केल्याप्रकरणी न्यायालयात मानहानीचा दावा दाखल करण्याचे आदेश विधी विभागाला दिले.
महापालिकेच्या स्थायी समितीवर घंटागाडीच्या कंत्राटाचा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवण्यात आला होता. सदर प्रस्तावावर चर्चा झाल्यानंतर सभापती सलीम शेख यांनी त्यावर निर्णय देण्यापूर्वी आरोग्याधिकाऱ्यांकडून सद्यस्थितीत घंटागाडीचा ठेका असलेले ठेकेदार आणि आता नव्याने कंत्राट देण्यात येणारे ठेकेदार यांची माहिती घेतली.

Web Title: Standing decision: The allegation of Nanda being defamed