शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

स्टॅण्डिंग चेअरमन.. बोले तो नया है वह...!

By admin | Updated: August 4, 2014 02:08 IST

स्टॅण्डिंग चेअरमन.. बोले तो नया है वह...!

नाशिक : महापालिकेच्या स्थायी समितीच्या हाती आर्थिक नाड्या असल्या, तरी समितीच्या सभापतीने थेट महापौरच झाल्याच्या थाटात वावरायचे नसते, याचे धडे बहुधा यापूर्वी शहराच्या प्रथम नागरिकाचे पद भूषविणाऱ्या पित्याने आपल्या बाळराजेंना दिले नसावे. म्हणूनच की काय सभापतीने पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्याची घोषणा करत थेट महापौरांनाच आव्हान दिले. परंतु पालिकेच्या राजकारणात मळलेल्या वाटेवर चालत सर्वाेच्च पदावर जाऊन पोहोचलेल्या महापौरांनीही ‘नया है वह...’ असे म्हणत पाणीपुरवठ्याबाबत सोमवारी (दि. ४) आपल्या दालनात आयुक्तांसह अधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे पाणीकपात रद्दचा अधिकृत निर्णय महापौरांच्या घोषणेनंतरच जारी होईल.गेल्या आठवड्यात वरुणराजाने दाखविलेल्या कृपावृष्टीमुळे शहराला पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण सुमारे ८५ टक्क्यांवर जाऊन पोहोचले. धरणातील पाणीसाठा वाढल्यानंतर महापालिकेचे स्थायी समिती सभापती राहुल ढिकले यांनी महापौरांना अंधारात ठेवत आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची भेट घेऊन पाणीकपात रद्दची मागणी केली आणि लगोलग पाणीकपात रद्दची घोषणाही करून टाकली. स्थायी समितीच्या सभापतींनी जाहीर केलेल्या या निर्णयाची महापौरांसह पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख अधीक्षक अभियंता रमेश पवार यांना सुतराम कल्पनाही नव्हती. पवार यांनी याबाबत आयुक्तांकडे केवळ चर्चा झाल्याचे सांगितले, तर महापौरांनी याबाबत बैठक घेऊन दोन दिवसांत निर्णय घेतला जाणार असल्याचे स्पष्ट केले. या प्रकारामुळे मनसेतीलच पदाधिकाऱ्यांमध्ये असमन्वयाचे दर्शन तर घडलेच; परंतु स्थायी सभापतींनी महापौरांचे अधिकार आपल्या हाती घेण्याचा आगंतुकपणाही दाखविल्याने राहुल ढिकले हे मनोरंजनाचा आणि चर्चेचा विषय बनले. एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात आपण कोण आहोत आणि आपले नेमके काय अधिकार आहेत, ह्याची समज नसल्याने हा सारा घोटाळा झाला. स्थायी समिती सभापतीचा रुबाब भारी, त्यांचा खजिना भारी, पण आपलं सगळंच लई भारी असे म्हणून कसे चालेल? महापौरांनी मात्र सभापतीकडे दुर्लक्ष करतानाच ‘नया है वह...!’ म्हणत सोमवारी पाणीपुरवठ्याची बैठक बोलावून आपणच ‘लई भारी’ असल्याचे दाखवून दिले आहे. त्याचा बदला आता बाळराजे आपल्या सोळा खांबी तंबूत कसा घेतात, याकडे पालिका वर्तुळात सर्वांचेच लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)