बंगळुरूहून पथक दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2018 00:57 IST2018-06-29T00:54:23+5:302018-06-29T00:57:08+5:30
ओझर : एचएएलचे सुखोई लढाऊ विमान तांत्रिक बाबीमुळे बुधवारी कोसळले होते. या दुर्घटनेचा तपास सुरू असून, अधिक चौकशी व तपासासाठी एचएएलचे खास पथक बंगळुरूहून नाशकात दाखल झाले आहे. या पथकाकडून अपघातग्रस्त विमानाचे अवशेष तसेच इतर बाबी पूर्णपणे तपासल्या जात आहेत. याठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त तैनात असून, विविध खात्यांच्या अधिकाºयांनीही सदर स्थळाला भेटी दिल्या आहे.

दरम्यान ज्याठिकाणी सदर विमान कोसळले तेथील शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निफाडचे तहसीलदार विनोद भामरे यांनी दिवसभर पाहणी करून झालेल्या शेती नुकसानीचा प्राथमिक अहवाल जिल्हाधिकारी व प्रांत यांना सादर केला आहे.
या दुर्घटनेत एकूण पाच शेतकºयांचे नुकसान झाले आहे. यात गोरठाण शिवारात विलास मधुकर निकम यांची डाळिंब बाग, तर वावीठुशी येथील सुखदेव बाबूराव निफाडे, योगेश नानाभाऊ ढोमसे यांच्या द्राक्षबागा तसेच बाळनाथ भागूजी पूरकर यांची मिरची बाग तसेच अलका सुरेश ढोमसे यांच्या काकडी बागेचे नुकसान झाल्याचे भामरे यांनी सादर केलेल्या प्राथमिक अहवालात नमूद केले आहे.
दरम्यान, जिल्हाधिकारी बालसुब्रमण्यम यांनीदेखील घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.