घोटी परिसरात उत्स्फूर्त स्वागत

By Admin | Updated: January 20, 2017 22:30 IST2017-01-20T22:30:19+5:302017-01-20T22:30:38+5:30

संतश्री निवृत्तिनाथ महाराज यात्रोत्सव : ठाणे, अहमदनगरमधील दिंड्या दाखल

Spontaneous reception in Ghoti area | घोटी परिसरात उत्स्फूर्त स्वागत

घोटी परिसरात उत्स्फूर्त स्वागत

घोटी : त्र्यंबकेश्वर येथे संतश्रेष्ठ श्री निवृत्तिनाथ महाराजांच्या यात्रोत्सवासाठी जाणाऱ्या परजिल्ह्यातील अनेक दिंड्या
घोटी शहरातून जात असल्याने  शहर ज्ञानेश्वर माउली  तुकारामच्या जयघोषाने दुमदुमत आहे. संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराज यांचा सोमवारी यात्रोत्सव असल्याने त्र्यंबकभेटीसाठी अनेक दिंड्या यात्रेच्या पूर्वी जातात.  नाशिक जिल्ह्यालगत असणाऱ्या ठाणे, अहमदनगर या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात  भाविक दिंडी सोहळ्याचे आयोजन करीत यात्रेच्या पूर्वी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होतात. दरम्यान ठाणे जिल्ह्यातून तसेच कोकणातून येणाऱ्या दिंड्या घोटी मुक्कामी राहतात आणि सकाळी रवाना  होतात.  यामुळे गेली दोन दिवसांपासून घोटी शहर ज्ञानोबा माउली तुकारामच्या जयघोषाने दुमदुमत असल्याने घोटी शहरात भक्तिमय वातावरण अनुभवण्यास मिळत  आहे.

Web Title: Spontaneous reception in Ghoti area