शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
3
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
4
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
5
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
6
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
7
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
8
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
9
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
10
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
11
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
12
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
13
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
14
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
15
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
16
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
17
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
18
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
19
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
20
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल

‘शेल्टर’ प्रदर्शनाचे दिमाखदार उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2017 00:33 IST

हक्काच्या घरासाठी हजारो पर्याय, आधुनिक जीवनशैलीला अनुसरून अद्ययावत सुविधा तसेच सुरक्षिततेची परिपूर्ण साधने असे गृहस्वप्नांचे पर्याय शुक्रवारी (दि. २२) खुले झाले. नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्टÑ व अन्य भागांतील नागरिकांसाठी एकाच छत्राखाली पर्याय देणाºया या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी गर्दी झाली. शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला आणि शेल्टर शोधणाºयांसाठी संधी चालून आली.

नाशिक : हक्काच्या घरासाठी हजारो पर्याय, आधुनिक जीवनशैलीला अनुसरून अद्ययावत सुविधा तसेच सुरक्षिततेची परिपूर्ण साधने असे गृहस्वप्नांचे पर्याय शुक्रवारी (दि. २२) खुले झाले. नाशिकच नव्हे तर उत्तर महाराष्टÑ व अन्य भागांतील नागरिकांसाठी एकाच छत्राखाली पर्याय देणाºया या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी गर्दी झाली. शहराच्या प्रथम नागरिक महापौर रंजना भानसी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला आणि शेल्टर शोधणाºयांसाठी संधी चालून आली.  शहरातील बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संस्थेच्या वतीने सातव्या शेल्टर प्रदर्शनाचा शानदार शुभारंभ महापौर रंजना भानसी यांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी नाशिकचे विभागीय आयुक्त महेश झगडे, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण, पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंगल, महाराष्ट्राचे क्रेडाई अध्यक्ष शांतीलाल कटारिया व राष्ट्रीय सहसचिव अनंत राजेगावकर, उपमहापौर प्रथमेश गीते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे तसेच क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल, शेल्टरचे समन्वयक उदय घुगे यांच्यासह क्रेडाईचे पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.  स्मार्ट सिटीच्या मार्गावर असलेल्या नाशिकला बांधकाम व्यवसायामुळे एक वेगळी ओळख निर्माण होत आहे. एखाद्या स्वप्नवतनगरीप्रमाणे नाशिकचा विकास होण्यासाठी बांधकाम व्यावसायिक झटत असून, त्यामुळे शहराचे सौंदर्य वाढले आहे, त्याचबरोबर गरजवंतांना हक्काची घरे उपलब्ध झाली आहेत असे प्रतिपादन महापौर रंजना भानसी यांनी यावेळी केले.  नाशिकच्या विकासात्मक वाटचालीत शिक्षण, साहित्य व संस्कृतीसोबतच बांधकाम व्यावसायिकांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे सांगून महापौर रंजना भानसी यांनी यावेळी विकासकांचे कौतुकही केले. यावेळी विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी  प्रदर्शनाच्या माध्यमातून विकासकांना मोठ्या प्रमाणात ग्राहक मिळतील, असा विश्वास  व्यक्त केला.विकासकांनी अशा प्रदर्शनाच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षित करताना नाशिकमध्ये गुंतवणूकदारांनाही आकर्षित करायला हवे. ज्यामुळे नाशिकमध्ये रोजगारात वृद्धी होईल व शहरात रोजगारासाठी स्थलांतरीत झालेले नागरिक रहिवासासाठी येथील गृहप्रकल्पांना पसंती देतील, असेही ते म्हणाले.शेल्टरचे आयोजक तथा क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी आयोजनमागील पार्श्वभूमी विषद केली. राज्यभरात ‘शेल्टर पॅटर्न’ पोहोचविणार नाशिकच्या शेल्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून प्रॉपर्टीसोबतच विविध व्यवसायांसह नाशिकच्या साहित्य-संस्कृती, शिक्षण, कृषी, पर्यावरण व पर्यटन आदी क्षेत्रांचा समावेश करून संपूर्ण शहराला या उपक्रमात सहभागी करून घेतले आहे. अशाप्रकारे व्यावसायिकांसोबत संपूर्ण शहराला सामावून घेण्याचा प्रयत्न दुर्मिळ असून, हा उपक्रम संपूर्ण राज्यभरात नाशिक शेल्टर पॅटर्न म्हणून राबविण्याचा क्रेडाईचा विचार असल्याचे महाराष्ट्र क्रेडाईचे अध्यक्ष शांतीलाल कटारिया यांनी सांगितले. ‘शेल्टर’ला पहिल्याच दिवशी प्रतिसाद क्रेडाईतर्फे आयोजित करण्यात आलेल्या शेल्टर प्रदर्शनाला नाशिककरांनी पहिल्याच दिवशी प्रतिसाद देत विविध स्टॉल्सला भेटी दिल्या. विविध गृहप्रकल्पांच्या स्टॉल्सला भेट देणाºया ग्राहकांनी घरखरेदीसाठी अर्थसहाय्य करणाºया बँका व फायनान्स कंपन्यांच्या स्टॉल्सलाही भेट देऊन घर खरेदीसाठी आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याविषयी माहिती घेतली.

टॅग्स :Nashikनाशिक