शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
2
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
3
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
5
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
6
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
7
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
8
गृहकर्ज घेताय? जाणून घ्या ५० लाखांच्या कर्जावर कोणत्या बँकेत सर्वात कमी ईएमआय
9
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
10
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
11
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
12
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
13
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
14
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
15
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
16
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
17
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
18
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
19
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
20
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?

निवडणुका जाहीर होताच मनसे, भाजपाची कार्यालये गजबगली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 17:59 IST

राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यात अनेक कार्यकर्ते होतेच परंतु नेत्यांचे आगमन झााल्याने मनसेच्या कार्यालयात अनेक वर्षात प्रथमच गर्दी झाली होती. अन्य पक्षांच्या कार्यालयांमध्ये मात्र पुर्ण वेळ कर्मचारी अथवा कार्यकर्ते वगळता फारशी गर्दी नव्हती. मात्र सायंकाळ नंतर अन्य पक्ष कार्यालये देखील गजबजली होती. 

ठळक मुद्देविविध पक्ष कार्यालयांमध्ये वाढली कार्यकर्त्यांची गजबज निवडणूक जाहीर होताच कार्यकर्त्यांमध्ये संचारला उत्साह

नाशिक : राज्यातील विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाल्यामुळे वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यात अनेक कार्यकर्ते होतेच परंतु नेत्यांचे आगमन झााल्याने मनसेच्या कार्यालयात अनेक वर्षात प्रथमच गर्दी झाली होती. अन्य पक्षांच्या कार्यालयांमध्ये मात्र पुर्ण वेळ कर्मचारी अथवा कार्यकर्ते वगळता फारशी गर्दी नव्हती. मात्र सायंकाळ नंतर अन्य पक्ष कार्यालये देखील गजबजली होती. निवडणूक आयोगाने शनिवारी (दि.२१) विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतरही राज्यातील विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँगे्रसच्या नाशिक शहर व जिल्हा कार्यालयातील गर्दी नव्हती.  राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात कार्यालयीन कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त कोणाचीही उपस्थिती नसल्याचे दिसून आले. सत्तेत असलेल्या भारतीय जनता पार्टीला गल्ली ते दिल्ली म्हणजेच महापालिकेपासून लोकसभेपर्यंत सत्ता मिळाल्याने ‘अच्छे दिन’ आलेल्या या पक्षाच्या मध्यवर्ती  कार्यालयात कर्मचाऱ्यांसोबतच कार्यकर्ते अणि राज्यस्तरीय पदाधिकाºयांची देखील उपस्थिती दिसून आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून सातत्याने गजबजलेल्या या कार्यालयात अजूनही पक्षचिन्ह व प्रचार साहित्याचा रखरखाव व नियोजन सुरू आहे, तर शिवसेनेच्या कार्यालयात नियमित काम करणारे कर्मचारी व कार्यकर्ते दिसून आले. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीतून बाहेर राहूनही लाखोंच्या सभा घेऊन संपूर्ण देशाचे लक्ष वेधून घेणारे राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यालय शनिवारी दिवसभर गजबजलेले होते. पक्ष विधानसभा नवडणूक लढविणार की नाही याविषयी साशंकता व्यक्त होत असताना पक्षाचे सरचिटणीस संदीप देशपांडे नाशिक जिल्ह्याचा आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये असल्यामुळे पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयात शहरासह संपूर्ण जिल्हाभरातील पदाधिकारी यांनी पक्षाच्या कार्यालयामध्ये गर्दी केली होती. काँग्रेस कमिटीचेही कुलूप उघडले लोकसभा निवडणुकीत राज्यात सपाटून पराभवाचा सामना करावा लागल्यापासून गलीतगात्र झालेल्या काँग्रेसचे शहर व जिल्हा कार्यालय गेल्या काही दिवसांपासून सातत्याने बंदच होते. परंतु निवडणुकीचे वेध लागल्याने पक्षाचे शहर व जिल्हा कार्यालयाचे कुलूप उघडण्यात आले आहे. मात्र याठीकाणी जिल्हा कार्यकारिणी अथवा शहर कार्याकारिणीसह कोणीही कार्यकर्ते अथवा नेते फिरकत नसल्याने येथील शुकशुकाट कायम आहे.  

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिकMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाMNSमनसेcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस