शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
'मेरी माँ मेरे साथ है'... मतदानादिवशीच आईला सोबत आणलं, अजित पवारांचं श्रीनिवास पवारांना प्रत्युत्तर
3
खलिस्तानी संघटनांकडून AAP ला १३० कोटी फंडिंग?; NIA चौकशीची शिफारस, अडचणी वाढणार?
4
बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणणे, शरद पवारांसाठी मडके फोडणे महाराष्ट्राला आवडलेले नाही - रमेश चेन्निथला
5
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL च्या शेअरमध्ये तेजी, HCL टेक घसरला
6
Bigg boss marathi 3 फेम अभिनेत्यासोबत स्पॉट झाली गौतमी; सोशल मीडियावर चर्चेला उधाण
7
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
8
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
9
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
10
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
11
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
12
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
13
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
14
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
15
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
16
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
17
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
18
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
19
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
20
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...

थंडीची चाहूल लागताच विविध रंगी ऊबदार कपडय़ांनी बाजार गरम, मफलरसह मखमली स्टॉल्स खरेदीचा ट्रेण्ड वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 6:23 PM

नागरिकांनी ठेवणीतील उबदार करडे बाहेर काढण्यास सुरुवात केली असून अनेक नवनवीन डिझाईनच्या उबदार कपडय़ांसह विविध फॅशनच्या मफलर व मखमली स्टॉल्सच्या खरेदीचा सध्या ट्रेण्ड दिसून येत आहे.

ठळक मुद्देथंडीपासून बचाव करण्याकरिता विविध प्रकारच्या गरम कपड्यांच्या खरेदीथंडीत वाढ झाल्यामुळे बाजारात लोकरीच्या ऊबदार कपड्यांना मागणीलहानापासून ते ज्येष्ठांसाठीचे विविध डिझाईनचे स्वेटर व जॅकेट्स बाजारात उपलब्ध

नाशिक : दरवर्षीच्या तुलनेत यंदा थंडीचे आगमनाची चाहूल लवकर जाणवू लागली आहे. सायंकाळी व सकाळच्या सुमारास तपमानाचा पारा घसरत असल्याने नागरिकांनी ठेवणीतील उबदार करडे बाहेर काढण्यास सुरुवात केली असून अनेक नवनवीन डिझाईनच्या उबदार कपडय़ांसह विविध फॅशनच्या मफलर व मखमली स्टॉल्सच्या खरेदीचा सध्या ट्रेण्ड दिसून येत आहे. थंडीपासून बचाव करण्याकरिता विविध प्रकारच्या गरम कपड्यांच्या खरेदीसाठी शहरासह ग्रामीण भागातूनही ग्राहक येत असल्याने शालीमार, मेनरोड,कॉलेडरोड, तिबेटीएन मार्के टसह शहरातील विविध भागात तात्पुरत्या स्वरुपात सुरु झालेल्या दुकानांमध्येही गर्दी दिसून येत आहे.हिवाळा येताच उबदार कपडयांचा बाजारही गरम होण्यास सुरू होतो. बाजारात जेथे सुंदर-सुंदर स्वेटर व जॅकटची बहार असते, तसेच सिल्कचे स्टॉल मुलींचे केंद्रबिंदू आहे. हे स्टॉल निरनिराळया रंगात उपलब्ध असतात. दुचाकी चालवताना किंवा थंडीत चेहऱ्याला कोरडी आणि निस्तेज होण्यापासून बचावासाठी मुली या स्टॉल्सचा प्रयोग करतात. सिल्क स्टॉल सूट सलवार, जींस अशा सर्व वेशभूषेत तरुणींना वेगळाच लुक देतो. बाजारात हे स्टॉल 100 रुपयांपासून पाचशे ते हजार रु पयांपर्यंत उपलब्ध आहेत. ड्रेसशी मॅचिंग किंवा आपल्या आवडीत्या रंगाच्या स्टॉलचा वापर करून आपल्या ड्रेसची शोभा वाढवविण्यासाठी मुलींकडून नवनवीन स्टॉल्सच्या खरेदीला पसंती मिळत आहेत. थंडीमध्ये लहान मुले व ज्येष्ठांची जास्त काळजी घेतली जाते. अगदी पायाच्या नखापासून ते डोक्यापर्यंत लोकरीचे कपडे परिधान केले जातात. खासकरून विविध रंगसंगती असलेली वस्त्रे वापरण्याकडे महिलांचा कल वाढू लागला आहे. आपल्या ड्रेसप्रमाणे आपला थंडीचा पेहराव असावा, असे महिलांना वाटते. तर पुरुषांनाही इतरांपासून आपला लूक वेगळा दिसावा यासाठी ट्रेण्डी जॅकेट व मफलर सारख्या उबदार कपडय़ांच्या खरेदी करण्याची इच्छा असल्याने आपल्याला हवे तसे आणि व्यक्तीमत्वात भर घालणाऱ्या ऊबदार कपडय़ांना तरुणांची पसंती मिळत आहे. तरुणाई महाग व फॅशनेबल कपड्यांना पसंती देताना दिसत आहेत. तरुणाई एकित्रतपणे खरेदीसाठी येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे दुकानेही फुललेली दिसतात. शहरातील थंडीत वाढ झाल्यामुळे बाजारात लोकरीच्या ऊबदार कपड्यांना मागणी वाढली आहे. लहानापासून ते ज्येष्ठांसाठीचे विविध डिझाईनचे स्वेटर व जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. जेन्ट्स, लेडीज स्वेटर, मफलर, स्कार्फ, लेस्कोटी, स्वेटकोटी, कुर्तापॅटर्न, सलवार सुट, जॅकेट, टी-शर्ट, जेन्ट्स मास्क फॅन्सी स्वेटर, हॅन्ड ग्लोव्हज, महिलांचे स्टोल, शॉल, सॉक्स, कानटोपी, हातमोजे, कानपट्टी, टोपी, कॅप्स अशा वस्तूंना मागणी वाढली आहे.दिवाळीनंतर आता थंडीचा जोर वाढत चालला आहे. थंडीपासून संरक्षण म्हणून ऊबदार कपड्यांना मोठी मागणी असते. हिवाळ्यातील ऊबदार कपडे आणि विविध प्रकारच्या आधुनिक स्वेटरच्या माध्यमातून ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी छोटे-मोठे व्यावसायिक सरसावल्याचे दिसून येते. स्थानिक शहरात अनेक ठिकाणी आणि खास करु न तिबेटीयन मार्केट परिसरात विविध प्रकारच्या स्वेटरची दुकाने सजली आहेत. विविध प्रकारचे ऊबदार कपडे तसेच बालकांसाठी खास गरम कपडे बाजारात गर्दी करून आहेत. 50 रूपयांपासून जवळपास पाच हजार रूपयांच्या जॅकेटपर्यंत वस्तू बाजारात आहेत. तीनशे ते पाचशे रुपयांच्या माफक दरातही योग्य वस्तू बाजारात उपलब्ध आहेत. लहान मुलांच्या हातमोज्यांपासून ते विविध लहान-लहान सुंदर बंद गळयाचे जॅकेट्स बाजारात उपलब्ध आहेत. मऊ कापसाचे सुंदर स्वेटर आणि क्विक ड्रायची मुलांचा थंडीपासून संरक्षण करण्यासाठी खरेदी केली जात आहे.

टॅग्स :MarketबाजारNashikनाशिक