सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या सभापतिपदी सोनवणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 18:25 IST2019-11-09T18:24:54+5:302019-11-09T18:25:29+5:30
सटाणा येथील सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या सभापतिपदी किरण सोनवणे, तर उपसभापतिपदी अरविंद सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

सटाणा ग्राहक संघाच्या सभापती किरण सोनवणे, उपसभापती अरविंद सोनवणे यांची निवड झाल्यानंतर सत्कार करताना मंगला सोनवणे, नीलेश पाकळे, अरुण सोनवणे, देवेंद्र सोनवणे, राजेंद्र देवरे, महेश सोनवणे, राजेंद्र सरदार, राहुल सोनवणे, प्रवीण बागड आदी.
सटाणा : येथील सटाणा सहकारी ग्राहक संघाच्या सभापतिपदी किरण सोनवणे, तर उपसभापतिपदी अरविंद सोनवणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
बागलाण तालुका सहायक निबंधक यांच्या कार्यालयात शनिवारी (दि.९) निवडणूक निर्णय अधिकारी गमे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या संचालक मंडळाच्या विशेष सभेत ही निवड करण्यात आली. किरण सोनवणे यांच्या अर्जावर सूचक म्हणून सरदार दिनकर यांनी तर अनुमोदक म्हणून प्रवीण सुरेश बागड यांनी सह्या केल्या. तसेच उपसभापतिपदासाठी अरविंद सोनवणे यांच्या अर्जावर सूचक म्हणून राजेंद्र देवरे यांनी तर अनुमोदक म्हणून देवेंद्र सोनवणे यांनी सह्या केल्या. संस्थेच्या वतीने नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष सुनील मोरे, संस्थेचे संचालक अरु ण सोनवणे, महेश सोनवणे, राहुल सोनवणे, नीलेश पाकळे, मंगला सोनवणे, श्रीपाद कायस्थ, गणेश सोनवणे, साहिल सोनवणे, सचिव दीपक अहिरे, सुशांत सोनवणे, यश सोनवणे, अंबादास सोनवणे, सोनल सोनवणे, मयुरी सोनवणे, मनाली सोनवणे, सरला सोनवणे आदी उपस्थित होते.