शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
2
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
3
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
4
केंब्रिजमधून M. Phi, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
5
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
6
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
7
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
8
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
9
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
10
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
11
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
12
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
13
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
14
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
16
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
17
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
18
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
19
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
20
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण

वरातीतील नाचण्याच्या व्हिडिओवरून युवकाच्या खुनाच्या गुन्ह्याची उकल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2021 7:20 PM

सुरगाणा : गुन्हे शाखा व सुरगाणा पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून घाटमाथ्यावरील युवकाच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित आरोपीस पकडण्यात यश मिळाले आहे. घटनेच्या रात्री रोटी येथे वरातीत मयत व संशयित हे डीजेवर नाचताना तसेच नाचणाऱ्यांच्या गर्दीतून बाहेर पडतानाचा व्हिडिओ एकाच्या मोबाइलमध्ये पोलीस कर्मचारी गोतुरणे यांना तपास करताना दिसून आल्याने संशयिताला ताब्यात घेण्यात यश मिळाले.

ठळक मुद्देमुख्य संशयित ताब्यात : सुरगाणा पोलिसांची कारवाई

सुरगाणा : गुन्हे शाखा व सुरगाणा पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईतून घाटमाथ्यावरील युवकाच्या खूनप्रकरणी मुख्य संशयित आरोपीस पकडण्यात यश मिळाले आहे. घटनेच्या रात्री रोटी येथे वरातीत मयत व संशयित हे डीजेवर नाचताना तसेच नाचणाऱ्यांच्या गर्दीतून बाहेर पडतानाचा व्हिडिओ एकाच्या मोबाइलमध्ये पोलीस कर्मचारी गोतुरणे यांना तपास करताना दिसून आल्याने संशयिताला ताब्यात घेण्यात यश मिळाले.

१ मार्च रोजी घाटमाथ्यावरील रोटी फाट्याजवळ वांजुळपाडा येथील युवक राजेंद्र ढवळू बागुल याचा मृतदेह आढळून आला होता. रोटी येथे वरातीत नाचण्याच्या किरकोळ कारणावरून हत्येचा प्रकार घडल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ग्रामीण अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा पोलीस तपास सुरू असताना सुरगाणा तालुक्यातील राजभुवन येथील मधुकर उर्फ चम्या गंगाराम राऊळ (२७) याचे नाव समोर आले. शोध सुरू असताना मधुकर उर्फ चम्या हा सटाणा तालुक्यातील तळवाडे दिगर येथे मिळून आला.

त्याला विश्वासात घेऊन अधिक चौकशी केली असता त्याने सांगितले की २८ फेब्रुवारी रोजी तो व त्याचे दाजी हे दोघे रोटी येथे वरातीत नाचण्यासाठी गेले होते. यावेळी वरातीत नाचण्यावरून आमचा राजू उर्फ राजेंद्र ढवळू बागुल रा.वांजुळपाडा याचेशी वाद झाला होता. म्हणून मी दुचाकीवर राजेंद्र यास बसवून गाळपाडा येथे दारू पिण्यासाठी बहाणा करून घेऊन गेलो.

गाळपाडा येथून परत येताना रोटीपाडा फाटा येथे मी त्यास दगडाने मारहाण करून नालीत पाडून त्याचे डोक्यात मोठा दगड घालून त्यास ठार मारले असल्याची कबुली दिली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.एक संशयित ताब्यातदोन दिवसात या गुन्ह्याची उकल करण्यासाठी गुन्हे शाखेचे एपीआय वाघ, एएसआय मुंढे, महाले, तुपलोंढे, खांडवी, चालक म्हसदे तसेच सुरगाणा येथील पोलिस निरीक्षक दिवानसिंग वसावे, सहायक पोलिस उपनिरीक्षक निलेश बोडखे, गोतुरणे, गवळी आदींनी केलेल्या तपासात यश मिळाले असून याप्रकरणी आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. 

टॅग्स :PoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी