शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांना सौर कृषिपंप

By admin | Updated: April 10, 2017 01:40 IST

नाशिक : महावितरणने सुरू केलेल्या सौर कृषिपंप योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे.

 नाशिक : ज्यांच्यापर्यंत अद्याप वीज पोहचलेली नाही अशा शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेवर कृषिपंप चालवावे यासाठी महावितरणने सुरू केलेल्या सौर कृषिपंप योजनेला चांगला प्रतिसाद लाभला असून, जिल्ह्यातील ५९ शेतकऱ्यांनी विजेवर अवलंबून न राहता सौर ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. सौर कृषिपंप योजनेला नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, आतापर्यंत ५९ शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेत सौर पंपावर सिंचन करण्यास सुरु वात केली आहे. यात सर्वाधिक १३ शेतकरी सिन्नर तालुक्यातील आहेत. ज्यांच्या शेतात आतापर्यंत वीज पोहचू शकली नाही, अशा शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने राज्य सरकार ही योजना राबवित आहे.पारंपरिक पद्धतीने विद्युतीकरण न झालेल्या शेतकऱ्यांनाही सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने सौर कृषिपंप योजना सुरू केली. अतिदुर्गम भाग, कोटेशन भरूनही तांत्रिक कारणामुळे तसेच वन विभागाकडून ना हरकत मिळत नसल्याने वीजजोडणी न मिळणे कठीण होते. जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समिती ही त्यांच्याकडे आलेल्या अर्जामधून पात्रता व प्राधान्यक्र मानुसार लाभार्थ्यांची निवड करीत असते.गेल्या आर्थिक वर्षात सौर कृषिपंप योजनेतून नाशिक जिल्ह्यातील १३० लाभार्थ्यांना लाभ देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या योजनेत सहभागी होण्यासाठी ऐकून २०३ जणांनी अर्ज केले. जिल्हास्तरीय समितीने यातील १३० लाभार्थ्यांची निवड केली. निवड झालेल्या लाभार्थ्यांपैकी ७९ जणांनी त्यांचा लाभार्थी हिस्सा जमा केला. त्यानुसार ७९ सौर कृषिपंपाची मागणी नोंदवण्यात आली. यातील ५९ शेतकऱ्यांच्या शेतात सध्या या योजनेतून सौर कृषिपंप बसवण्यात आले असून, सिंचनासाठी त्यांचा वापरही सुरू झाला आहे. तालुकानिहाय या योजनेतून सध्या कार्यरत सौरपंपांची संख्या - देवळा - ५, चांदवड - ५, नांदगाव - २, येवला - ६, इगतपुरी -४ सिन्नर - १३, पेठ- ४, सुरगणा- १०, त्र्यंबक- ६, निफाड- ४, मालेगाव- १ याप्रमाणे आहे. मुख्य अभियंता दीपक कुमठेकर यांनी सौर कृषिपंपाची नुकतीच पाहणी केली. यावेळी नाशिक शहर मंडळाचे प्रभारी अधीक्षक अभियंता अभिमन्यू चव्हाण, उप कार्यकारी अभियंता डॉ. नीलेश रोहणकर, कनिष्ठ अभियंता राहुल शिंदे आदि उपस्थित होते.