लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाची पर्वा न करता श्रीराम भक्तांची पावले शनिवारी दुपारी १२ वाजता शहरातील विविध ठिकाणी असलेल्या श्रीराम मंदिराकडे वळली होती. अंगातून घामाच्या लाटा निघत असतानाही रामजन्माच्या वेळी सियार रामचंद्र की जय... असा जयघोष करत आनंद आणि भक्तीमय वातावरणात रामनवमी साजरी केली.नवीन आणि जुना जालना भागातील श्रीराम मंदिरांमध्ये सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. जुन्या जालन्यातील आनंदवाडी श्रीराम मंदिरात गेल्या आठ दिवसांपासून विविध कार्यक्रम सुरू आहेत. सकाळी रामदास महाराज आचार्य यांनी जन्मसोहळ्यावर विवेचन केले.शहरातील गवळी मोहल्ला, बडी सडक, शेलगावकर श्रीराम मंदिरातही जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}