शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
2
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
3
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
4
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
5
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
6
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी
7
बापासमोरच दोन वर्षाच्या मुलाला जबड्यात धरून बिबट्या पसार; १५० जवानांकडून शोधमोहिम, मृतदेह सापडला
8
आपली मुलगी राजकारणात येणार? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले, म्हणाले...
9
लवकरच बाजारात येतेय Toyota ची Mini Fortuner! महाराष्ट्रातल्या 'या' शहरात होणार उत्पादन; किती असू शकते किंमत? जाणून घ्या
10
तंत्रज्ञानाची किमया! सॅमसंगने AI Home केलं लाँच; आता घर होईल स्मार्ट, फक्त एक क्लिक अन्...
11
तांत्रिक बिघाड की मोसादचा हात? संयुक्त राष्ट्रांत पॅलेस्टाईनवर चर्चा होताच ४ बड्या नेत्यांचा माईक बंद  
12
पद्मश्री ज्येष्ठ लेखक एस. एल. भैरप्पा काळाच्या पडद्याआड; पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपतींनी वाहिली श्रद्धांजली
13
लडाखमधील आंदोलनाला हिंसक वळण, जाळपोळ, लेहमध्ये ४ जणांचा मृत्यू, ७० जण जखमी 
14
हलगर्जीपणाचा कळस! सरकारी रुग्णालयात दुसऱ्याच पायाची सर्जरी, ऑक्सिजन मास्क काढला अन्...
15
"फायनलमध्ये बघून घेऊ’’, दोन वेळा मार खाल्यानंतर शाहीन शाह आफ्रिदीचं भारताला आव्हान    
16
समस्या संपतील, स्वामी कायम सोबत असतील; ९ गुरुवार व्रताने बदल नक्की दिसतील, अशक्य शक्य होईल!
17
जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, RTO Tax देखील कमी झाला; तिहेरी फायदा कोणालाच कळला नाही...
18
समृद्धी महामार्गावर दुहेरी उत्पन्नाचा स्रोत; सौरऊर्जा निर्मिती करणारा देशातील पहिला 'एक्सप्रेसवे' !
19
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
20
आयटी-मेटलसह 'या' क्षेत्रातील शेअर्समध्ये मोठी पडझड; गुंतवणूकदारांचे ३ लाख कोटी रुपये बुडाले

साठ वर्षांनंतर मुंगसरे शिवरस्त्याचा ‘मार्ग मोकळा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 00:05 IST

साठ वर्षांनंतर अखेर मुंगसरे शिवरस्त्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकरी व गावकरी वर्गात समाधानाचे व आनंदाच्या वातावरणात कामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली.

मातोरी : साठ वर्षांनंतर अखेर मुंगसरे शिवरस्त्याचा मार्ग मोकळा झाल्याने शेतकरी व गावकरी वर्गात समाधानाचे व आनंदाच्या वातावरणात कामाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांनी अतिक्रमणे स्वत:हून काढून घेतली.गेल्या साठ वर्षांपासून मुंगसरे ते मातोरी गावाला जोडणारा रस्ता बंद होता. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी अतिक्र मणे करून रस्ता काबीज केला होता. हा रस्ता जवळपास नामशेष झाला होता; परंतु मुंगसरे गावातील नागरिकांना प्रवासासाठी, तर शेतकऱ्यांना शेतमाल वाहतुकीसाठी मुंगसरे फाटा येथे एक ते दीड किलोमीटर यावे लागत असे. याबाबत पाच महिन्यांपूर्वी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाले होते. स्थानिक शेतकºयांनी अनेक वर्षं शासकीय कार्यालयात पाठपुरावा केला, शेवटी आपणच पुढाकार घेऊन रस्ता दुरुस्त करू असा निर्णय शेतकरी वर्गाने घेतला असता याबाबतची दखल मुंगसरे गावच्या सरपंचांनी घेतली व याबाबतचा अहवाल शासन दरबारी सादर केला असता तुटपुंजा निधी का होईना मिळाला. निदान शेतकºयांना हातभार लागला. यावेळी तानाजी पिंगळे, सरपंच कल्पना भोर, बाळासाहेब म्हैसधुणे, कैलास पिंगळे, हिरामण पिंगळे, बाबूराव पिंगळे, शिवाजी भोर, दशरथ हगवणे, केरुतात्या हगवणे, राजाराम फडोळ, शिवाजी पिंगळे, शेखर पिंगळे, सुखदेव पिंगळे आदी उपस्थित होते.रस्त्याचा फायदा कोणाला होईल?रस्त्याचा फायदा हा शालेय विद्यार्थ्यांना थेट हायवेवर जावे लागणार नाही त्यामुळे अपघात होण्याचा धोका कमी होईल, नाशिक ते मुंगसरे अंतर सुमारे पाच किलोमीटरने कमी होईल. शेतकरीवर्गाला भाजीपाला शेतमाल वाहतुकीसाठी फायदा होईल. अत्यावश्यक सुविधांसाठी दीड किलोमीटर दूर फाट्यावर जावे लागणार नाही.गावातील शिव रस्ता गेल्या साठ वर्षांपासून बंद व अतिक्रमित अवस्थेत होता. गावाबाहेरून जाणारा हायवेच वापरायचा झाल्याने ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष झाले होते. मोठ्या परिश्रमाने व पाठपुराव्याने आम्हाला रस्ता सुरू करण्यात यश आले आहे.- राजाराम फडोळ, ग्रामस्थअनेकदा निवेदने दिली; पण कोणीही लक्ष देत नसल्याने आमचा रस्ता दुर्लक्षित झाला होता. अर्जदेखील दिले, त्यांनी याकडे दुर्लक्ष केले पण दीड महिन्यानी दखल घेत अधिकारी आमच्यापर्यंत आले होते आणि आता कामाला सुरुवात केली आहे.  - प्रभाकर पिंगळे, शेतकरी

टॅग्स :nashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालयFarmerशेतकरी