मालेगावी भाजपतर्फे शिवगान स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST2021-02-11T04:15:39+5:302021-02-11T04:15:39+5:30

छत्रपती शिवाजी महाराज यांची आख्यायिका सांगणारे गीत, पोवाडे, अभंग यांची जुगलबंदी बघावयास मिळाली. स्पर्धेत सांघिक गटात प्रथम क्रमांक ...

Sivagan competition by Malegaon BJP | मालेगावी भाजपतर्फे शिवगान स्पर्धा

मालेगावी भाजपतर्फे शिवगान स्पर्धा

छत्रपती शिवाजी महाराज यांची आख्यायिका सांगणारे गीत, पोवाडे, अभंग यांची जुगलबंदी बघावयास मिळाली. स्पर्धेत सांघिक गटात प्रथम क्रमांक चांदवड येथील स्वरांजली ग्रुप यांनी मिळविला तर द्वितीय हिरामण लोंढे ग्रुप व तृतीय श्री सद्गुरू संगीत विद्यालय यांनी मिळविला. वैयक्तिक गटात प्रथम राधिका हेमंत पाटील, द्वितीय सचिन निकुंभे, तृतीय नारायण शंकर महाजन हे विजेते ठरले. स्वयंसेवक संघ प्रचारक हर्षवर्धन भोसले व जिल्हा उपाध्यक्ष हरिप्रसाद गुप्ता यांनी दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात केली.

उत्तर महाराष्ट्र विभाग सहसंयोजक आशिष कासार, विशाल जाधव, जिल्हा संयोजक सतीश उपाध्याय तसेच जिल्हाध्यक्ष सुरेश निकम, जिल्हा संघटन सरचिटणीस देवा पाटील, सांस्कृतिक तालुका संयोजक योगेंद्र पाटील, कोषाध्यक्ष सुधीर जाधव, हरिप्रसादजी गुप्ता, बच्छाव, जिल्हा सहसंयोजक हरिशंकर दायमा, भूषण शिंदे, श्याम गांगुर्डे, सौरभ अक्कर उपस्थित होते.

Web Title: Sivagan competition by Malegaon BJP