सिन्नरला चोरट्यांना हटकवल्याने दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 01:26 AM2021-02-12T01:26:13+5:302021-02-12T01:26:59+5:30

नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे शिवारात उभ्या असलेल्या कंटनेरमधून डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यांना हटकवल्याने चोरट्यांनीच नागरिकांवर दगडफेक केल्याची घटना घडली. नागरिकांच्या प्रतिकारानंतर चोरटे चोरीसाठी वापरण्यात येणारी कार सोडून पसार झाले. 

Sinnar was stoned to death by thieves | सिन्नरला चोरट्यांना हटकवल्याने दगडफेक

सिन्नरला चोरट्यांना हटकवल्याने दगडफेक

Next

सिन्नर : नाशिक-पुणे महामार्गावर गोंदे शिवारात उभ्या असलेल्या कंटनेरमधून डिझेल चोरी करणाऱ्या चोरट्यांना हटकवल्याने चोरट्यांनीच नागरिकांवर दगडफेक केल्याची घटना घडली. नागरिकांच्या प्रतिकारानंतर चोरटे चोरीसाठी वापरण्यात येणारी कार सोडून पसार झाले. 
गोंदे फाट्यावर हॉटेल पुरोहित आहे. याठिकाणी कंटनेर (एच. आर. ५५ डब्लू ७७९७)चा चालक झोपला होता.  महिपाल पुरोहित लघुशंकेसाठी उठले. त्यावेळी कंटनेरमधून अज्ञात तीन चोरटे डिझेल काढत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी कामगारांना उठवून चोरट्यांना हटकले असता चोरट्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली.  कामगार हातात लाठ्या-काठ्या घेऊन प्रतिकार करण्यासाठी येत असल्याचे पाहून चोरट्यांनी त्यांच्यासोबत आणलेली कार (एम.एच. ४३ ए.क्यू. २७७२) तेथेच ठेवून अंधारातून पळ काढला.
पोलिसांनी चोरट्यांनी आणलेली सफारी कार, त्यात डिझेलचे सात रिकामे ड्रम, एका ड्रममध्ये पाच 
लिटर डिझेल व कारमध्ये असलेला एक सॅमसंग कंपनीचा मोबाइल 
जप्त केला. 

Web Title: Sinnar was stoned to death by thieves

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.