सिन्नरला पाच धरणांमध्ये केवळ ४ टक्के साठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 18:19 IST2019-04-26T18:17:56+5:302019-04-26T18:19:02+5:30
धरणांमध्ये असलेल्या पाण्याचा बेसुमार उपसा झाल्याने यंदा दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यातील पाच धरणांमध्ये आता केवळ ४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.

सिन्नरला पाच धरणांमध्ये केवळ ४ टक्के साठा
सिन्नर : धरणांमध्ये असलेल्या पाण्याचा बेसुमार उपसा झाल्याने यंदा दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. तालुक्यातील पाच धरणांमध्ये आता केवळ ४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
पाचही धरणात सद्यस्थितीतील जलसाठे पिण्यासाठी आरक्षित असून, एकूण २५ दलघफू साठा शिल्लक आहे. २८ फेब्रुवारीनंतर अवैध उपसा थांबविणे गरजेचे असताना प्रशासनाकडून पावले उचलली न गेल्याने पाणी उपसा झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटला आहे.