शहरं
Join us  
Trending Stories
1
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
3
RBI च्या मोठ्या झटक्यानंतर Paytm च्या शेअरचं काय होणार? ब्रोकरेनं दिलं अवाक् करणारं टार्गेट
4
पंजाब, दिल्ली ते गुजरात; आम आदमी पक्ष फुटल्याने भाजपाचा दुहेरी फायदा, कशी बदलली समीकरणे?
5
दागिन्यांसाठी सुनेचा फिल्मी ड्रामा; स्वत:च्या घरात रचला दरोड्याचा बनाव, पण ४ तासांत पर्दाफाश
6
सहकुटुंब सहपरिवार अनुभवता येणार छत्रपती शिवरायांचा पराक्रम; रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' चित्रपटाला U/A प्रमाणपत्र
7
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
8
अष्टपैलू क्रिकेटपटूवर दोन वर्षांची बंदी; कोकेन सेवन केल्याचे ड्रग्ज टेस्टमध्ये झाले निष्पन्न
9
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
10
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
11
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
12
"तो अध्याय संपला...", गायक राहुल देशपांडेची घटस्फोटावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया; पुढे म्हणाला...
13
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
14
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
15
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
16
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
17
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
18
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
19
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
20
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला शिवसेनेचा वचननामा प्रसिध्द

By admin | Updated: November 16, 2016 01:41 IST

सिन्नरला शिवसेनेचा वचननामा प्रसिध्द

सिन्नर : नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या मध्यवर्ती प्रचार कार्यालयाचे उद्घाटन व वचननाम्याचे प्रकाशन खासदार हेमंत गोडसे, आमदार राजाभाऊ वाजे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, संपर्कप्रमुख संजय बच्छाव, लक्ष्मी ताठे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. येथील आडव्या फाट्यावरील गोदावरी लॉन्सवर झालेल्या कार्यक्रमास मविप्रचे संचालक कृष्णाजी भगत, पंचायत समिती सदस्य उदय सांगळे, शिवाजी देशमुख, तालुकाप्रमुख दीपक खुळे, शहरप्रमुख गौरव घरटे, अ‍ॅड. एन. एस. हिरे, रामनाथ धनगर, नगराध्यक्षपदाचे उमेदवार किरण डगळे, सागर वारुंगसे, शिवसेनेचे उमेदवार यांच्यासह मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते यावेळी वचननामा प्रसिध्द करण्यात आला. यात शहर विकासाची विविध आश्वासने देण्यात आली आहेत. नाशिक लोकसभा मतदार संघातील सहा विधानसभा मतदार संघांपैकी एकट्या सिन्नर विधानसभा मतदार संघास निम्मा स्थानिक विकास निधी दिला असून इतर शासकीय योजनांमधूनही सिन्नरसाठी मोठ्या प्रमाणात विकास कामे मंजूर केल्याचे गोडसे यावेळी म्हणाले. सिन्नर तालुक्यातील आमदार वाजे यांनी राबविलेल्या जलयुक्त शिवारच्या कामांचेही गोडसे यांनी यावेळी कौतूक केले.  तिकीट वाटपात काही जणांशी आमचे मतभेद झाले असले तरी मनभेद झाले नसल्याचे वाजे यावेळी म्हणाले. आपण फक्त विकासकामांचा प्रचार करणार असून विरोधकांच्या प्रत्येक टीकेला उत्तर देण्याची आवश्यकता नाही. आपल्यावर तमासगीर म्हणून टीका करणाऱ्यांनी गेली पाच वर्षे पालिकेत केलेला तमाशा सिन्नरकरांनी पाहिला असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. शहरातील स्मशानभुमींची दूरवस्था झाली असून नागरिकांचे मरणही त्यांनी अवघड करुन ठेवल्याचे वाजे म्हणाले. केवळ सह्णाजीराव असणाऱ्यांपेक्षा विकासकामांबाबत स्वत:ची मते असणाऱ्या उमेदवारांना आपण पालिकेची तिकीटे दिली असल्याचे वाजे म्हणाले.(वार्ताहर)