शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नरला २० उमेदवारांची अनामत जप्त

By admin | Updated: February 27, 2017 01:24 IST

शैलेश कर्पे : सिन्नर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात रणांगण गाजविण्यासाठी उतरलेल्या ५९ पैकी २० उमेदवारांवर आपली अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त होण्याची नामुष्की ओढावली.

शैलेश कर्पे : सिन्नरजिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या रिंगणात रणांगण गाजविण्यासाठी उतरलेल्या ५९ पैकी २० उमेदवारांवर आपली अनामत रक्कम (डिपॉझिट) जप्त होण्याची नामुष्की ओढावली. राष्ट्रवादीच्या ७, मनसेच्या ३, राष्ट्रीय समाज पक्षाच्या ३, कॉँग्रेस व बहुजन समाज पार्टीच्या प्रत्येक १, तर ५ अपक्षांना आपले डिपॉझिट गमवावे लागले. सर्व जागांवर निवडणूक लढविणाऱ्या शिवसेना व भाजपाच्या एकाही उमेदवाराचा यात समावेश नाही.  निवडणुकीत डिपॉझिट जप्त झालेल्या २० उमेदवारांचे १० हजार ५५० रुपये शासनाच्या तिजोरीत जमा झाले आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका २३ फेबु्रवारी रोजी पार पडल्या होत्या. जिल्हा परिषदेच्या सिन्नर तालुक्यातील सहा जागांसाठी २० उमेदवार रिंगणात होते. त्यात राष्ट्रवादीचे नांदूरशिंगोटे गटाचे उमेदवार बाळासाहेब वाघ वगळता राष्ट्रवादीच्या दोन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. मनसे व रासपने गटात प्रत्येकी एका जागेवर उमेदवार उभा केला होता. या दोघाही उमेदवारांना आपली अनामत रक्कम वाचविता आली नाही. जिल्हा परिषदेसाठी तालुक्यात एकमेव अपक्ष उमेदवार रिंगणात होते. नांदूरशिंगोटे गटातील अपक्ष उमेदवार अ‍ॅड. विलास पगार यांचेही डिपॉझिट या निवडणुकीत जप्त झाले. देवपूर व ठाणगाव या जिल्हा परिषद गटात शिवसेना व भाजपा उमेदवारांत दुरंगी लढत झाली. त्यामुळे या दोन्ही गटात कोणत्याही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही. सिन्नर तालुक्यातील सर्वच्या सर्व सहा गट ओबीसीसाठी राखीव असल्याने उमेदवारासाठी पाचशे रुपये अनामत होती. पाच उमेदवारांची दोन हजार ५०० रुपयांची अनामत या निवडणुकीने शासनाच्या तिजोरीत जमा झाली.  सिन्नर पंचायत समितीच्या १२ जागांच्या निवडणुकीत ४१ उमेदवारांनी आपले नशीब अजमाविले. त्यात १५ उमेदवारांवर आपले डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली. ठाणगाव, चास व भरतपूर गणात दुरंगी लढत झाली होती. या गणातील एकाही उमेदवाराचे डिपॉझिट जप्त झाले नाही. नायगाव गणातील ३, गुळवंच, शिवडे, डुबेरे व पांगरी गणातील प्रत्येकी २ तर माळेगाव, मुसळगाव, गुळवंच, देवपूर, नांदूरशिंगोटे या गणातील प्रत्येकी एका उमेदवाराचे डिपॉझिट शासन तिजोरीत भरले गेले. पंचायत समितीच्या १५ उमेदवारांचे ८ हजार ५० रुपये शासनाकडे जमा झाले. जिल्हा परिषदेच्या ५ व पंचायत समितीच्या १५ अशा एकूण २० उमेदवारांचे १० हजार ५५० रुपये शासनाच्या महसुलात भर पडली. जिल्हा परिषद सदस्यावर अनामत जप्तीची वेळनायगाव गटातील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य अर्जुन बर्डे यांनी या निवडणुकीत माळेगाव गणातून पंचायत समिती निवडणुकीसाठी उमेदवारी केली होती. पंचायत समितीचे सभापतिपद अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने बर्डे यांनी पंचायत समितीच्या निवडणूक आखाड्यात उतरले होते; मात्र राष्ट्रवादीचे उमेदवार बर्डे यांना केवळ ८७९ मते मिळाल्याने त्यांचे डिपॉझिट जप्त होण्याची वेळ आली.