शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
2
अमित शाह यांच्या फेक व्हिडिओ प्रकरणात एकाला अटक, कोण अडकलं? CM हिमंता यांनी दिली माहिती
3
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
4
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
5
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
6
'तुमच्या स्वार्थाचं गणित उघड झालं'; मुख्यमंत्री केलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना आव्हाडांचे प्रत्युत्तर
7
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
8
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
9
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
10
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
11
MS Dhoni Rocked, काव्या Shocked! हेडसाठी सापळा रचला अन् SRH मालकीणचा चेहरा पडला 
12
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
13
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
14
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
15
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
16
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
17
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
18
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
19
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
20
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!

गायक शिंदे पिता-पुत्र येणार ‘आमने-सामने’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 1:51 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असा संदेश आपल्या अनुयायांना दिलेला असताना नाशकात मात्र त्यांच्या अनुयायांनी नेमकी त्याउलट वाटचाल सुरू केली असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेचे निमित्त शोधले आहे.

नाशिक : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिका, संघटित व्हा व संघर्ष करा’ असा संदेश आपल्या अनुयायांना दिलेला असताना नाशकात मात्र त्यांच्या अनुयायांनी नेमकी त्याउलट वाटचाल सुरू केली असून, त्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या काळाराम मंदिर सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेचे निमित्त शोधले आहे.  रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांनी सत्ताधारी पक्षाची साथ धरल्यामुळे त्यांना बाजूला सारून रिपाइंतील अन्य गट-तटांचे नेते एकत्र आले आहेत. विशेष म्हणजे शहरात दोन ठिकाणी होणाºया या अभिवादन सभेचे मुख्य आकर्षण असलेल्या आंबेडकरी ‘जलसा’साठी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे व पुत्र आदर्श शिंदे हेदेखील रिपाइंच्या गटबाजीत आमने-सामनेच्या ‘जलसा’त उतरले आहेत.  नाशिक येथील काळाराम मंदिरात दलित, मागासवर्गीयांना प्रवेश मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २ मार्च १९३० रोजी सत्याग्रह केला होता. या घटनेचे स्मरण म्हणून दरवर्षी २ मार्च रोजी आंबेडकरी अनुयायांच्या वतीने नाशकात अभिवादन सभेचे आयोजन केले जाते. यंदाही या अभिवादन सभेची जोरदार तयारी करण्यात आली असून, या सभेच्या निमित्ताने आंबेडकरी शिकलेला समाज संघटित होऊन व्यवस्थेविरुद्ध संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहित व्हावा, असा त्यामागचा हेतू आहे. परंतु प्रत्यक्षात या अभिवादन सभेच्या निमित्ताने आंबेडकरी अनुयायांमध्ये पारंपरिक असलेली गटबाजी उफाळून आली आहे. रिपब्लिकन पार्टीचे नेते व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी सत्ताधारी भाजपाची साथ धरल्यामुळे एकप्रकारे त्यांनी द्रोह केल्याचे मानून राज्यातील रिपाइंचे सर्व गट-तट आठवलेंच्या विरोधात एकवटले आहेत. आठवले यांच्या नेतृत्वाखालील रिपाइंने काळाराम सत्याग्रहींना अभिवादन करण्यासाठी गोल्फ क्लब मैदानाची निवड करून थेट आठवले यांनाच त्यासाठी निमंत्रित केले आहे, तर प्रा. कवाडे यांची पिपल्स रिपब्लिकन, अण्णासाहेब कटारे यांची राष्टÑीय रिपब्लिकन, मनोज संसारे यांची स्वाभिमानी रिपाइं, इंदिसे यांची एकतावादी रिपाइं, भालेराव यांची राष्टÑीय दलित पॅँथर, अर्जुन डांगळे यांची जनशक्ती रिपाइं, विवेक चव्हाण यांची दलित कोब्रा व प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील भारिप बहुजन महासंघ असे डझनभर संघटनांनी एकत्र येऊन सत्याग्रहांचे ऐतिहासिक ठिकाण असलेल्या गंगाघाटावर अभिवादन सभेचे आयोजन केले आहे. आंबेडकरी गौरवगीतांसाठी सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात असताना त्यात त्यांचा पुत्र आदर्श शिंदेदेखील सध्याच्या युवा वर्गात अधिक आकर्षण झाला आहे. त्यामुळे शुक्रवार, दि. २ मार्च रोजी शहरात दोन ठिकाणी होणाºया अभिवादन सभेचे मुख्य आकर्षण असलेले ‘जलसा’साठी दोन्ही गटांना शिंदे पिता-पुत्रांनाच आमंत्रित केले आहे. आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या जलसात आदर्श शिंदे, तर गंगा घाटावरील जलसात ज्येष्ठ गायक आनंद शिंदे व दत्ता शिंदे यांना पाचारण करण्यात आले आहे.जलसा भरविण्याची परंपरादरवर्षी नाशकात आयोजित केल्या जाणाºया या अभिवादन सभेच्या निमित्ताने आंबेडकरी गौरवगीतांचा ‘जलसा’ भरविण्याचीही परंपरा सुरू झाली आहे. अभिवादन सभेत आजवर मान्यवरांनी मार्गदर्शन करून आंबेडकरी जनतेला एकजूट व एकसंघ राहून अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याचा संदेशच दिला आहे. त्यामुळे अभिवादन सभा म्हणजे एकप्रकारे आंबेडकरी अनुयायांसाठी स्फूर्तीच ठरत असताना त्यात आता ‘जलसा’ची भर पडल्याने दरवर्षाचे ते प्रमुख आकर्षण ठरले आहे. या जलसासाठी नाशिककर मोठ्या संख्येने गर्दी करीत असतात.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर