Nashik Kumbh Mela Update: आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यात साधुमहंतांसह भाविकांची गर्दी वाढण्याची शक्यता गृहीत धरून दळणवळणाच्या दृष्टीने सर्वाधिक महत्त्वाच्या २२७० कोटींच्या रस्त्यांना गती देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (२९ एप्रिल) दिल्या.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
या बैठकीला जिल्हाधिकारी जलज शर्मा, मनपा आयुक्त मनीषा खत्री, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, त्र्यंबकेश्वर नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीया देवचक्के आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
रस्त्यांच्या कामाला गती मिळेल
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीला गती आली असून, राज्य शासनाने मंजूर केलेल्या रस्ते विकासकामांना सिंहस्थ आढावा बैठकीमध्ये जिल्हा समितीने मान्यता दिली आहे. त्यामुळे आताच्या दृष्टीने नियोजनात असलेल्या रस्त्यांच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळेल, असा विश्वास गेडाम यांनी व्यक्त केला.
रेल्वेचे चेअरमन येणार नाशिकला
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने प्रयागराज येथे करण्यात आलेल्या विविध उपाययोजनांच्या पार्श्वभूमीवर आगामी नाशिकच्या कुंभमेळ्यासाठी नाशिक रोड रेल्वे स्थानकाला पर्यायी रेल्वे स्थानके निर्माण करणे व गर्दीचे विभाजन करून नियोजन करणे यादृष्टीने आढावा घेण्यासाठी रेल्वेचे चेअरमन सतीश कुमार हे शनिवारी (३ मे) नाशिकमध्ये येणार आहेत.
नाशिकमधील या रस्त्यांची कामे होणार
नाशिक - त्र्यंबक रस्त्याचे काँक्रिटीकरणासह सहा पदरीकरण, पालखी मार्ग ३५० कोटी.
नाशिक-दिंडोरी-वणी-नांदुरी रस्ता रुंदीकरण, सुधारणा १०० कोटी.
नाशिक-दिंडोरी रस्त्यावरील उणंदा नदीवरील पूल १५ कोटी.
दुगाव ते जऊळके त्र्यंबकसाठी २१५ कोटी.
जानोरी-ओझर ५० कोटी.
भरवीर टाकेद, बैज यासाठी ११९ कोटी.
चिंचोली-वडगाव-पिंगळा-विंचूर दळवी-पांढुर्ली रस्ता - २०७ कोटी
वाडीव-हे, दहेगाव, जातेगाव, तळेगाव, महिरावणी, दुडगाव, गणेशगाव रस्ता २०० कोटी.
दुगाव-ढकांबे-जऊळके रस्ता १६३ कोटी.
शिर्डी - राहता बाह्यवळण रस्ता १६५ कोटी.
त्र्यंबकेश्वर-तुपादेवी-तळवाडे-उमराळे-दिंडोरी-पालखेड-जोपूळ-पिंपळगाव २१५ कोटी.
दुगाव-जुने घागूर-ढकांबे-आंबे दिंडोरी-जऊळके रस्ता १६३ कोटी.
पेठ-तोरंगण-हरसूल-वाघेरा-अंबोली-पहिने-घोटी २०५ कोटी.
जानोरी-ओझर आंतरराष्ट्रीय विमानतळ - ५० कोटी.
आडगाव-गिरणारे-वाघेरा-हरसूल-ओझरखेड १५७ कोटी.
त्र्यंबक-देवगाव-खोडाळा ४७ कोटी.
इतर कामे १७ कोटी.