मेंढी येथे साकारणार शिवाश्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2019 05:04 PM2019-03-31T17:04:04+5:302019-03-31T17:05:04+5:30

वावी : सिन्नर तालुक्यातील मेंढी येथे शिवाश्रम बांधकामाच्या पायाभरणीचा कार्यक्रम नुकताच पार पडला. अभिनेते सचिन गवळी व स्मृती गवळी यांच्या हस्ते शिव आश्रमाच्या बांधकामासाठी खोदलेल्या पायाची सपत्नीक पूजा करून त्यामध्ये माती पायाभरणीस प्रारंभ करण्यात आला.

 Shivashram will be able to make sheep here | मेंढी येथे साकारणार शिवाश्रम

मेंढी येथे साकारणार शिवाश्रम

Next

डॉ. विजय तनपुरे, प्रख्यात अभिनेते सचिन गवळी, सौ. स्मृती गवळी, सामाजिक कार्यकर्ते उत्तम गाडे, उद्योजक शिवनाथ कापडी, सोपान पागिरे, शिवचरित्रकार नवनाथ चव्हाण, शिवशाहीर स्वप्निल डुंबरे, प्रा. प्रकाश खुळे, सचिन ओझा, अ‍ॅड. भाग्यश्री ओझा, छावा क्र ांतिवीर सेनेचे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष विलास पाटणी, प्रेरणा मंडळाचे अध्यक्ष प्रभाकर बेलोटे, सोपान पाडवी, नीलेश तनपुरे आदि प्रमुख पाहुणे व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. तनपुरे यांची शिवाश्रमाची संकल्पना असून या शिवाश्रमाच्या उभारणीसाठी तालुक्यातील मेंढी येथील डॉ. आनंद पाटील फाऊंडेशन संचलित सहारा व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक मधुकर गीते यांनी त्यांच्या स्वमालकीची ५० गुंठे जमीन शिवाश्रमास दान दिली आहे. त्याच जागेवर शिव आश्रमाचा पायाभरणी कार्यक्र म संपन्न झाला. व्यसनमुक्ती केंद्रातील रूग्णांनी आत्म अनुभव कथन केले. गीते यांनी सहारा व्यसनमुक्ती केंद्राच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. गीते यांनी बेसहारा झालेल्यास जमीन देऊन सहारा दिल्याची भावना तनपुरे यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी शिव आश्रमच्या वतीने आश्रमासाठी जमीन दान देणारे मधुकर गीते, सौ. शीला गीते, दीपक गीते, वनिता गीते यांचा शाल, श्रीफळ व गुलाब पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तनपुरे महाराज, सचिन गवळी, स्मृती गवळी, प्रभाकर बेलोटे, नवनाथ चव्हाण, स्वप्निल डुंबरे यांनी याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाळकृष्ण तनपुरे, गौरव तनपुरे, मंगेश खालकर, संदीप गीते, वैभव डोमाळे वैष्णव नागरे, निलेश तनपुरे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title:  Shivashram will be able to make sheep here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.