शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
4
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
5
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
6
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
7
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
8
शांतीदूत बनायला गेला अन् स्वत:च तोंडावर पडला; अमेरिकेने पाकिस्ताची दोन जहाजे होर्मुझमधून हाकलली!
9
​परतवाडा अश्लील व्हिडिओ कांड : तपासासाठी ४७ जणांची एसआयटी मैदानात; आरोपींची संख्या वाढणार 
10
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
11
₹६०८ कोटींची ऑर्डर मिळताच सुस्साट पळाला 'हा' शेअर; जोरदार तेजी, तुमच्याकडे आहे का?
12
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
13
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
14
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
15
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
16
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
17
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
18
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
19
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
20
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या सुमन बर्डे बिनविरोध

By admin | Updated: March 14, 2017 17:07 IST

सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या सौ. सुमन राजाराम बर्डे तर उपसभापतिपदी सौ. वेणूबाई अशोक डावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सिन्नर : सिन्नर पंचायत समितीच्या सभापतिपदी शिवसेनेच्या सौ. सुमन राजाराम बर्डे तर उपसभापतिपदी सौ. वेणूबाई अशोक डावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तहसीलदार तथा पिठासन अधिकारी मनोजकुमार खैरनार यांच्या अध्यक्षेतखाली सकाळी ११ वाजता सभापती व उपसभापती निवडणुकीच्या प्रक्रियेस प्रारंभ झाला. निर्धारित वेळेत शिवसेनेच्या सौ. सुमन बर्डे यांनी सभापतिपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून रोहिणी कांगणे व भगवान पथवे यांची स्वाक्षरी होती. उपसभापतिपदासाठी शिवसेनेच्या सौ. वेणूबाई डावरे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. त्यावर सूचक म्हणून संग्राम कातकाडे व संगिता पावसे यांची स्वाक्षरी होती. निर्धारित वेळेत सभापतिपदासाठी सौ. बर्डे व उपसभापतिपदासाठी सौ. डावरे यांचा प्रत्येकी एक अर्ज आल्याने बिनविरोध निवडीची घोषणा निवडणूक अधिकारी खैरनार यांनी केली. निवडणूक प्रक्रियेत नायब तहसीलदार प्रशांत पाटील व गटविकास अधिकारी रत्नाकर पगार यांनी सहाय्यक म्हणून काम पाहिले. बैठकीस शिवसेनेचे गटनेते संग्राम कातकाडे, पंचायत समिती सदस्य जगन्नाथ भाबड, भगवान पथवे, सौ. शोभा बर्के, संगिता पावसे, रोहिणी कांगणे यांच्यासह भाजपाचे गटनेते विजय गडाख, रवींद्र पगार, तातू जगताप, सौ. योगिता कांदळकर उपस्थित होते.