शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

शिवसेना कोऱ्या कागदावर सही करेल : राऊत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 1:24 AM

पंतप्रधान मोदी यांनी विश्वभ्रमंती केली, मात्र अयोध्येला गेले नाहीत़ त्यांनी राम मंदिराबाबत कायदा बनवावा या कायद्याच्या समर्थनासाठी शिवसेना कोºया कागदावर सही करेल़ पंतप्रधानांनी ठरविल्यास २०१९ पूर्वी राम मंदिराच्या निर्माणास सुरुवात होऊ शकते, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि़ २०) नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केले़

नाशिक : पंतप्रधान मोदी यांनी विश्वभ्रमंती केली, मात्र अयोध्येला गेले नाहीत़ त्यांनी राम मंदिराबाबत कायदा बनवावा या कायद्याच्या समर्थनासाठी शिवसेना कोºया कागदावर सही करेल़ पंतप्रधानांनी ठरविल्यास २०१९ पूर्वी राम मंदिराच्या निर्माणास सुरुवात होऊ शकते, असे प्रतिपादन शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी (दि़ २०) नाशिकच्या शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत केले़अयोध्येतील राम मंदिर हा हिंदू धर्मीयांच्या श्रद्धेचा व भावनेचा विषय असून, यावर कोणतेही न्यायालय निर्णय देऊ शकत नाही, असेही राऊत म्हणाले़भाजपावर टीका करताना राऊत म्हणाले की, शिवसेना-भाजपासोबत केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सोबत गेली, मात्र सत्तेवर येताच भाजपाला हिंदुत्वाचा विसर पडला़ राम मंदिराबाबत गत चार वर्षांत काहीही झालेले नसून याबाबत खोटी आश्वासन देऊ नका. भाजपाला राम मंदिराची आठवण करून देण्यासाठीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे २५ नोव्हेंबरला अयोध्येला जाणार आहेत़ यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना राम मंदिर तुम्ही बांधता की, आम्ही बांधू हा प्रश्न विचारणार असून शिवसेना केव्हाही राम मंदिर बांधण्यासाठी तयार असल्याचे राऊत यांनी सांगितले़शिर्डी संस्थानच्या पैशांतून बांधलेल्या घरांच्या चाव्या मोदी यांनी गरिबांना दिल्यात खºया, मात्र या घरांसाठी सरकारने एक पैसाही का दिला नाही, असा सवाल करून राऊत यांनी मराठवाड्याला पाणी देण्यावरून राजकारण न करता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली. यावेळी संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, शहरप्रमुख महेश बिडवे, सचिन मराठे, सुहास कांदे, विजय करंजकर, दत्ता गायकवाड, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते आदी उपस्थित होते़मनसे व अन्य पक्ष शिवसेनेच्या भूमिकेबाबत काय बोलतात याकडे लक्ष देण्याची गरज नसून त्यांची चिऊ-चिऊ, काऊ-काऊ सुरूच असते, त्याकडे आम्ही लक्ष देत नाही़ तसेच हिंदूंच्या कत्तली करा असे बोलणाºया ओवेसींकडून शहाणपणा शिकण्याची आम्हाला गरज नाही, असा टोलाही राऊत यांनी लगावला़

टॅग्स :PoliticsराजकारणSanjay Rautसंजय राऊतShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिन