मंगळ ग्रहावर पोहोचणार  शिरसगाव लौकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 12:52 AM2019-06-30T00:52:05+5:302019-06-30T00:52:21+5:30

येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी जिल्हा परिषद शाळेतील मुलांची नावे नासाच्या अवकाश यानावर झळकणार आहेत. त्यासाठीची आॅनलाइन नोंदणी शाळेतील  उपक्रमशील शिक्षक हनुमंत काळे यांनी केली आहे.

 Shirasgaon gourd to reach the planet Mars | मंगळ ग्रहावर पोहोचणार  शिरसगाव लौकी

मंगळ ग्रहावर पोहोचणार  शिरसगाव लौकी

googlenewsNext

जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील शिरसगाव लौकी जिल्हा परिषद शाळेतील मुलांची नावे नासाच्या अवकाश यानावर झळकणार आहेत. त्यासाठीची आॅनलाइन नोंदणी शाळेतील  उपक्रमशील शिक्षक हनुमंत काळे यांनी केली आहे.
विद्यार्थ्यांचे बोर्डिंग पासही आले आहेत. अमेरिकेच्या नासा या जगतविख्यात अवकाश संशोधन करणाऱ्या संस्थेचे मंगळ रोव्हर २०२० हे अंतरिक्षयान लाला ग्रह म्हणून ओळखल्या जाणाºया मंगळाच्या दिशेने झेपावणार आहे. या अंतरिक्ष यानाबरोबर स्टेनसील्ड चिपवर आपली नावे पाठवून मानवी इतिहासातील दुसºया ग्रहावर आपल्या पाऊलखुणा सोडण्याची ऐतिहासिक संधी नासाच्या वतीने जनतेला उपलब्ध करून दिली आहे. ही मोहीम नासाच्या वतीने चंद्र मोहीम ते मंगळ मोहिमेच्या प्रवासापर्यंतच्या मिशनला उद्देशून सार्वजनिक सहभाग मोहीम अंतर्गत राबवत आहेत.
आतापर्यंत जगभरातून ७० लाखांपेक्षा अधिक जणांनी नासासाठी आपली नावनोंदणी केली आहे. एकट्या तुर्की या देशातून २४ लाखपेक्षा जास्त नोंदणी झाली आहे, तर दुसºया  क्र मांकावर आपला भारत देश आहे. भारतातूनही आठ लाखांपेक्षा जास्त लोकांनी आपली नावे मंगळावर पाठवण्यासाठी नोंदविली आहेत. शिरसगाव लौकीच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी शाळेतील सर्व विद्यार्थ्यांची, शाळेचेही नावे या उपक्र मासाठी नोंदवले होते. त्याची आॅनलाइन आलेले बोर्डिंग पासचे वाटप शाळेत करण्यात आले.

Web Title:  Shirasgaon gourd to reach the planet Mars

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.