शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

गर्भपात प्रकरणातील शिंदेची कारागृहात रवानगी

By admin | Updated: March 1, 2017 00:18 IST

नाशिक : अवैध गर्भलिंग तपासणी तसेच गर्भपातप्रकरणी डॉ़ शिंदे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे संचालक डॉ़ बळीराम शिंदे याची प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टंडन यांनी डॉक्टर शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़

नाशिक : अवैध गर्भलिंग तपासणी तसेच गर्भपातप्रकरणी पीसीपीएनडीटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेले डॉ़ शिंदे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरचे संचालक डॉ़ बळीराम शिंदे याची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने मंगळवारी (दि़ २८) न्यायालयात हजर करण्यात आले होते़ प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी टंडन यांनी डॉक्टर शिंदेची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली़ दरम्यान, आठ दिवसांच्या पोलीस कोठडीच्या कालावधीत शिंदे हॉस्पिटलमधून गर्भपाताच्या गोळ्या तसेच इंजेक्शन तसेच गर्भतपासणीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे़ तसेच डॉ. शिंदेच्या वैद्यकीय पदवीबाबतही संशय व्यक्त केला जातो आहे़मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस उपनिरीक्षक पी़ डी़ पवार यांनी रविवारी (दि़२६) केलेल्या तपासणीत हॉस्पिटलची कायदेशीर परवानगी नसताना त्यामध्ये अतिदक्षता विभाग, आॅपरेशन थिएटर तसेच मेडिकलदेखील आहे़ विशेष म्हणजे गर्भपाताची परवानगी नसतानाही हॉस्पिटलमध्ये गर्भपाताच्या गोळ्या व इंजेक्शन आढळून आले आहेत़ विशेष म्हणजे या गोळ्या मेडिकलमध्ये मिळत नाहीत. शिवाय त्या घेण्यासाठी स्त्रीरोगतज्ज्ञांनाही प्रथम चेकद्वारे पैसे अदा करून मागवाव्या लागतात व गोळ्यांचा हिशेबही ठेवावा लागतो़  अशोकनगर येथील एका गर्भवती महिलेची तपासणी केल्यानंतर स्त्री गर्भ असल्याचे सांगून गर्भपात केल्याच्या कारणावरून मनपाच्या आरोग्य विभागाने छापा टाकून चौकशी केली़ यात गर्भपात करीत असल्याचे समोर आल्याने महापालिकेच्या आरोग्य विभागाने रुग्णालय सील करून डॉ़ शिंदे विरोधात मुंबई नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. (प्रतिनिधी), तर रविवारी महिला पोलीस उपनिरीक्षक पी़ डी़ पवार यांनी शिंदे हॉस्पिटल व रिसर्च सेंटरची तपासणी करून सील केले आहे़ तर डॉ़ शिंदे याचे ओझरच्या हॉस्पिटलमधील सोनोग्राफी मशीन निफाडच्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ़ एम़ आऱ राठोड यांनी यापूर्वीच सील केले आहे़दैव बलवत्तर म्हणून महिला वाचलीअशोकनगर परिसरातील महिलेचा गर्भपात करताना सुमारे तीन सेंटीमीटरपर्यंत तिची गर्भपिशवीच फाटून रक्तस्त्राव झाला होता़ या महिलेचे दैव बलवत्तर म्हणून तिचे प्राण वाचले़ विशेष म्हणजे या महिलेच्या सांगण्यानुसार गर्भपात करताना भूलही देण्यात आलेली नव्हती़ गर्भलिंग तपासणीचे मशीन एका चादरीत ठेवून ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइट टीव्हीद्वारे महिलांची गर्भलिंगतपासणी केली जात होती़- पी़ डी़ पवार, महिला पोलीस उपनिरीक्षक, मुंबई नाका पोलीस ठाणे़