सायखेडा बाजारात बंदमुळे शुकशुकाट

By Admin | Updated: October 21, 2016 01:34 IST2016-10-21T01:25:44+5:302016-10-21T01:34:43+5:30

सायखेडा बाजारात बंदमुळे शुकशुकाट

Shikkukkat due to shutting down market | सायखेडा बाजारात बंदमुळे शुकशुकाट

सायखेडा बाजारात बंदमुळे शुकशुकाट

सायखेडा : नेत्यांबद्दल फेसबुकवर आक्षेपार्ह मजकूर व फोटो पोस्ट केल्याच्या निषेधार्थ बुधवारी (दि. १९) सायखेडा येथे आपले व्यवहार बंद ठेवून उत्स्फूर्त बंद पाळण्यात आला.
नेहमी गजबजलेल्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसत होता. अतिशय शांततेत बंद पाळण्यात आला. मेनरोड़ बाजारपेठ सायखेडा चौफुलीवर, मार्केट परिसरातील दुकाने व संपूर्ण दुकाने बंद होती. फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू होत्या.
तहसीलदार भामरे यांनी सायखेडा येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये शांतता समितीची बैठक घेतली. यावेळी त्यांनी बंद शांततेत पाळण्याचे आवाहन केले. यावेळी भाजपा नेते जगन कुटे, भाजपा निफाड़ तालुका अध्यक्ष आदेश सानप, जितेंद्र कुटे, शरद कुटे, रामा गिते आदि उपस्थित होते. सायखेडा पोलीस स्टेशनमध्ये बदनामी केल्याबद्दल आदेश सानप यांच्या तक्रारी वरुणदेव गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)

Web Title: Shikkukkat due to shutting down market