शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! जसलोक, केईएमसह मुंबईतील ५० हून अधिक हॉस्पिटलना बॉम्बने उडविण्याची धमकी
2
पाणीपुरी खाल्ल्याने ८० पेक्षा अधिक जणांना विषबाधा;पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू
3
हरियाणात काँग्रेसला मोठा धक्का; आमदार, माजी खासदारांनी ४० वर्षांचे नाते संपविले, सदस्यत्वाचा राजीनामा
4
दिल्लीत फडणवीसांबाबत ठरले! महाराष्ट्रात नो चेंज; देवेंद्रना प्रश्न विचारताच गोयल मधेच बोलले...
5
टॅक्सी - रिक्षा चालकांसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कल्याणकारी मंडळ, विमा, मुलांना नोकरी...
6
उत्तर प्रदेशातील मतदारांनी भाजपला का नाकारले? आढावा घेण्यासाठी पक्षाने तयार केली 40 पथके
7
अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती महागाई रोखण्यात अडथळा; RBI गव्हर्नरांचे महत्वाचे वक्तव्य
8
अभिषेक बच्चनला बंपर लॉटरी लागली; खटाखट खटाखट १५ कोटींचे सहा आलिशान फ्लॅट खरेदी केले
9
मोठी बातमी! पंढरपूर- कराड रोडवर भीषण अपघात; सहा महिला जागीच ठार, एक गंभीर
10
उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला
11
Reliance Jio : जिओचे नेटवर्क बंद!; इंटरनेटपासून फायबरपर्यंत सर्वच बंद झाल्याने युजर्सचा संताप
12
शेतकऱ्यांनो खात्यात खटाखट खटाखट २००० रुपये आले का? मोदींनी एक बटन दाबले, २० हजार कोटी वळते केले
13
सन्मान निधीनंतर आता कोट्यवधी शेतकऱ्यांना NDA सरकार देणार आणखी एक गिफ्ट?
14
'अ‍ॅनिमल पार्क'संदर्भात रणबीर कपूरच्या सहकलाकाराने दिली मोठी अपडेट, म्हणाला- "सिनेमाची कथा..."
15
पुढच्यावेळी रॉबर्ट वाड्रा संसदेत दिसणार?; प्रियंका गांधी वायनाडला जाताच पतीची घोषणा
16
लोकसभा अध्यक्षाची निवड कशी केली जाते? कोणते अधिकार मिळतात? जाणून घ्या...
17
सरकारचा एक निर्णय अन् लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला; RTE प्रवेश पुन्हा रखडले
18
वयाच्या चाळीशीतही अभिनेत्रीच्या हॉटनेसची चर्चा; साऊथ नंतर आता बॉलिवूडमध्येही बोलबाला
19
मुंबई, पाटणा, जयपूर, कोलकाता...देशभरातील 40 विमानतळांना बॉम्बने उडवण्याची धमकी
20
वर्षा गायकवाडांचा आमदारकीचा राजीनामा; काँग्रेस- शिवसेनेचे आणखी काही आमदार राजीनामा देणार

शिरवाडेलगत अपघात;  सात ठार, ३४ जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 1:34 AM

मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ दोन आयशर टेम्पोच्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू, तर ३४ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२४) साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जावळाच्या कार्यक्रमासाठी जाताना कांडेकर कुटुंबीयांवर काळाने घाला घातला.

पिंपळगाव बसवंत : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे फाट्याजवळ दोन आयशर टेम्पोच्या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू, तर ३४ जण जखमी झाल्याची घटना रविवारी (दि.२४) साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली. जावळाच्या कार्यक्रमासाठी जाताना कांडेकर कुटुंबीयांवर काळाने घाला घातला.नाशिक शहरातील टाकळी परिसरातील राहुलनगर येथील रहिवासी स्वप्निल कांडेकरयांच्या मुलाचा जावळाचा कार्यक्रम चांदवड तालुक्यातील केद्राई देवस्थान येथे रविवारी आयोजित करण्यात आला होता. त्यामुळे कांडेकर कुटुंबीय नातेवाइकांसह आयशर (एमएच १६ ३५७०) टेम्पोने जात होते. महामार्गावरील पिंपळगाव बसवंत येथून सात किलोमीटर अंतरावर असलेल्या शिरवाडा फाट्यावर ११.३० वाजता सदर आयशर चांदवडच्या दिशेने चालला असता समोरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात वाहनाने याला हूल दिली. त्यामुळे सदरच्या आयशर चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून तो रस्त्याचे दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर जात समोरून भरधाव वेगाने येणाºया आयशर टेम्पोवर (एमपी ०९- २०२८) जाऊन आदळला.  या अपघातात आयशरमधील सुशीला सुरेश गवळी (६६),  निवृत्ती रामभाऊ लोंढे (७०),  शोभा सूर्यवंशी (६०) हे जागीच  ठार झाले. तर सुदाम पाटणकर (६६), सुंदराबाई आनंदा कांडेकर (८०), आशा दत्तात्रय कांडेकर, समृद्धी मनिष डांगे (६ महिने) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अन्य एका मृताचे नाव समजू शकले नाही. अपघातातील मृत नाशिकरोड भागातील रहिवासी आहेत. अन्य ३४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर पिंपळगाव बसवंत येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये चंद्रकला डांगे, जयश्री खोसे, अनिता नामगे, प्रदीप नामगे, अलका चौधरी, भाग्यश्री जंगे, मिनाक्षी केशव शिंदे, हिराबाई रघुनाथ कांडेकर, मयुरी योगेश चौधरी, आशा दत्तूू कांडेकर, स्वाती म्हस्के, कैलास म्हस्के, अंकिता खोसे, कुणाल वाघ, रीतेश पवार, गार्गी पाटणकर, रूद्र म्हस्के, शिवम म्हस्के, दिपा मोनगे, शिवाजी आभाळे, जनार्दन सुर्यवंशी, शांताबाई चव्हाण, समर्थ कोतवाल, सोनाली झेंडे, विनिता कांडेकर, कैलास म्हस्के, स्वाती म्हस्के, सुनिल पगारे, अनिकेत खोसे, कृष्णाबाई शिंदे, इंदरेश खान, स्वाती गवळी आदिंचा समावेश आहे. अपघातानंतर आयशर चालक फरार झाला आहे. सदर अपघाताची नोंद पिंपळगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. घटनास्थळी वरीष्ठ पोलीस अधिकारी शर्मिला बालावलकर, उत्तम कडलक आदिनी भेट देऊन पहाणी केली.अपघात स्थळी जगतगुरू नरेंद्र महाराज संस्थान अ‍ॅम्बुलन्ससह पिंपळगाव बसवंत येथील सर्व अ‍ॅम्बुलन्स घटनास्थळी काहि वेळेतच हजर झाले. त्यांनी पिंपळगाव आणि वडनेर भैरव पोलिसांच्या सहकार्याने तातडीने जखमींना रूग्णालयात दाखल केले.महामार्गावर कोंडीघटनास्थळावरील दृश्य भयावह होते. जावळाच्या कार्यक्रमासाठी आवश्यक साहित्य घटनास्थळी अस्ताव्यस्त पसरले होते. दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. अपघातानंतर महामार्गावरील वाहतुकीची मोठ्या प्रमाणावर कोंडी झाली होती. खासगी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने स्त्याच्या बाजूला करण्यात आली.पोलिस आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने काही वेळाने वाहतूक सुरळीत करण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू