बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 13:34 IST2019-03-11T13:34:35+5:302019-03-11T13:34:42+5:30
पिळ्कोस : कळवण तालुक्यातील चौरंगनाथ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पिळकोस शिवारातील मेंगदर ,फांगदर तसेच वाघदरा व देवडोंगराच्या लगतच्या ,चाचेर ,पांढरीपाडा , धनगरवाडा ,परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात मेंढी जखमी
पिळ्कोस : कळवण तालुक्यातील चौरंगनाथ किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पिळकोस शिवारातील मेंगदर ,फांगदर तसेच वाघदरा व देवडोंगराच्या लगतच्या ,चाचेर ,पांढरीपाडा , धनगरवाडा ,परिसरात बिबट्याने पुन्हा धुमाकूळ घालण्यास सुरूवात केली आहे. पिळकोस येथील बापू जाधव यांच्या शेतात कचरू गोवेकर यांच्या मेंढ्यांच्या कळपावर रविवारी सायंकाळी आठ वाजता बिबट्याने मेंढ्याच्या वाड्यावर अचानक हल्ला करत एका मोठी मेंढी ओढून नेली. अचानक झालेल्या बिबट्याच्या या हल्ल्याने परिसरातील मेंढपाळ व मेंढीसमवेत असलेले धनगर बांधवाचा थरकाप उडाला. यावेळी काही मेंढपाळानी प्रसंगावधान राखत फटाके फोडल्याने बिबट्याने जखमी केलेली मेंढी सोडून पळ काढला. यात गोवेकर यांच्या मेंढीला पायाला, गळ्याला दुखापत झाली आहे .बिबट्याच्या कायमच्या दहशतीमुळे मेंढपाळ व आदिवासी बांधवाना पशुपालन व्यवसाय कसा करावा हा प्रश्न भेडसावू लागला आहे. पशुपालकांनी पिंजरा लावण्याचा आग्रह धरला असून देवळा वनविभागाने बिबट्याला लवकर जेरबंद करावे अशी मागणी केली आहे .