न्यू इरा इंग्लिश स्कूलचा शशांक कदम शाळेत प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2020 01:29 IST2020-07-30T23:52:45+5:302020-07-31T01:29:12+5:30
नाशिक : गेल्या १७ वर्षांपासून १०० टक्के निकाल असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा यंदाही १०० टक्के निकाल लागला आहे. शाळेचा विद्यार्थी शशांक कदम याने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला.

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या मराठा हायस्कूलचा निकाल ९१.५८ टक्के इतका लागला आहे. यशस्वी विद्यार्थ्यांसमवेत संस्थेच्या सरचिटणीस निलीमा पवार. समवेत मराठा हायस्कूलचे शिक्षकवृंद.
नाशिक : गेल्या १७ वर्षांपासून १०० टक्के निकाल असणाऱ्या न्यू इंग्लिश स्कूल शाळेचा यंदाही १०० टक्के निकाल लागला आहे. शाळेचा विद्यार्थी शशांक कदम याने ९८ टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला. दिव्या परदेशी (९६.८०), तर सिद्धेश वाजे (९६.६०) टक्के गुण मिळवून अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले. शाळेतील १३ विद्यार्थी हे ९५ टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले. ६८ विद्यार्थी हे ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण झाले, तर १४९ विद्यार्थी हे ८० टक्केगुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत. २८६ विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयात चार विद्यार्थ्यांनी शंभरपैकी १०० गुण मिळविले.