शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यकर्त्यांचा पोरखेळ सुरू शरद पवार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 02:04 IST

विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला जनतेने कौल दिलेला असताना पदे वाटण्यावरून दोन्ही पक्षात जे काही चालू आहे तो निव्वळ पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली.

नाशिक : विधानसभा निवडणुकीत भाजप व शिवसेनेला जनतेने कौल दिलेला असताना पदे वाटण्यावरून दोन्ही पक्षात जे काही चालू आहे तो निव्वळ पोरखेळ असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी केली. शेतकरी संकटात असताना सत्तेतील लोकांनी असं वागणं बरं नव्हे असेही ते म्हणाले. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस एकत्र येऊन सरकार स्थापन करण्याची कोणतीही शक्यता नसल्याचेही पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.पवार यांनी, विधानसभा निवडणुकीत जनतेने दोन्ही पक्षांना सरकार बनविण्याची संधी दिली व सक्षम विरोधी पक्ष म्हणून आम्हाला विधिमंडळात पाठविले आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांनी सरकार स्थापन करावे, राज्यातील शेतकरी संकटात सापडलेला असताना त्यांनी सरकार बनविण्याची जबाबदारी पार पाडण्याऐवजी दोन्ही बाजूंनी गेल्या आठ दिवसांपासून निव्वळ पोरखेळ सुरू आहे असे सांगणाºया पवार यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत आपल्याला येऊन भेटून गेल्याचे सांगितले; मात्र त्या भेटीबाबत अधिक बोलण्याचे टाळले. राज्यात भाजपची भरभराट झाल्याचे आपल्याला तरी या निवडणुकीत दिसले नाही, असे सांगून पवार यांनी ‘अबकी बार २२० पार’ अशी वल्गना त्यांनी केली होती; परंतु मतदारांनी त्यांना तशी संधी दिली नसल्याचे सांगितले.राज्यातील शेतकरी संकटात असून, अशा वेळी त्यांना सरकारच्या मदतीची गरज आहे पण सरकार याकामी अपयशी ठरले आहे असे सांगून, संपूर्ण पीक नष्ट झाले, डोक्यावर बँकांचे कर्ज आहे, पुढचे पीक घेणे अवघड आहे अशा परिस्थितीत केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या पिकांचे सरसकट पंचनामे करावेत, त्यांना एकरी नुकसानीच्या प्रमाणात भरपाई द्यावी, शेतकºयांना पुढील पिकासाठी बिनव्याजी कर्ज द्यावे तसेच त्यांची सर्व प्रकारची वसुली स्थगित करून त्यांना पुढील पाच ते सात वर्षाचे हप्ते बांधून द्यावेत, यासाठी आपण स्वत: प्रयत्न करणार असल्याचे पवार यांनी सांगितले.नाशिक जिल्ह्णातील तरुण पिढीने साथ दिलीविधानसभा निवडणुकीच्या आपल्या दौºयाला नाशिकपासून सुरुवात झाली व त्यानंतर आपण राज्यभर फिरलो. या दरम्यान, मी सुरू केलेल्या निवडणूक कॅम्पेनिंगला नाशिक जिल्ह्णातील तरुण पिढीने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला व त्यांनी संपूर्ण महाराष्टत जो संदेश द्यायचा तो दिला. त्यानंतर राज्यात तरुण पिढी आपल्या पाठीशी उभी राहिल्याचे गौरवोद्गारही पवार यांनी काढले.

 

टॅग्स :PoliticsराजकारणSharad Pawarशरद पवार