शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार येणार : महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांची धावपळ

By admin | Updated: August 24, 2016 00:53 IST

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फेरबदलाचे वारे

नाशिक : आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मरगळ आलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या जिल्हा व शहर अध्यक्ष बदलाचे वारे पुन्हा वारे वाहू लागल्याचे वृत्त असून, मध्यंतरीच्या काळात शहराध्यक्ष बदलावर पक्षश्रेष्ठींनीच पडदा टाकलेला असल्यामुळे येत्या आठवड्यात नाशिक दौऱ्यावर येत असलेले पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या पुढ्यातच जिल्हाध्यक्षपदाचा फैसला होणार असल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या दौऱ्यावर येऊन गेलेले पक्षनिरीक्षक आमदार जितेंद्र आव्हाड यांनी तसे संकेत दिले असून, त्यामागे जिल्हाध्यक्षांवर असलेली पक्षाची नाराजी कारणीभूत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. कांद्याच्या प्रश्नावर राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी सरकारवर कांदा फेक करावी असे आदेश दीड महिन्यापूर्वीच आव्हाड यांनी दिले होते, परंतु ग्रामीण राष्ट्रवादीने त्याकडे दुर्लक्ष करून एकप्रकारे आव्हाड यांचे आदेश अव्हेरल्याची भावना व्यक्त केली गेली, त्यामुळेच की काय दोन दिवसांपूर्वी आव्हाड यांना पुन्हा ‘कांदा फेको’चे स्मरण करून द्यावे लागले. या शिवाय आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाध्यक्षपदासाठी अनेकांच्या बाह्या फुरफुरू लागल्या आहेत. त्यात माजी आमदार दिलीप बनकर, माजी खासदार देवीदास पिंगळे यांचे नाव अग्रेसर आहे. बनकर यांच्या पत्नी सध्या जिल्हा परिषदेच्या सदस्य असून, पाच वर्षांत त्यांना कोणतेही महत्त्वाचे पद मिळालेले नाही, त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार संघाची मशागत करण्यासाठी बनकर यांना पक्षपदाची आस असल्याचे त्यांच्या समर्थकांकरवी सांगितले जात आहे. जिल्हाध्यक्षपदाबरोबरच शहराध्यक्षपदाचे खांदेपालट होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे. मध्यंतरी शहराध्यक्ष बदलासाठी सरसावलेले पदाधिकारी शांत झाले असून, विद्यमान शहराध्यक्षांनी पक्ष श्रेष्ठींकडे केलेली शिष्टाई यशस्वी झाल्याचा दावा त्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे, तसे असले तरी, ऐनवेळी पक्ष काय निर्णय घेतो ते सांगता येणार नाही.