शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
विजयी ‘षटकार’ मारल्यावर PBKS च्या नावे पराभवाचा ‘चौकार’; काय चुकलं? श्रेयसने स्पष्टच दिले उत्तर
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
8
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
9
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
10
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
11
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
12
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
13
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
14
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
15
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
16
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
17
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
18
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
19
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
20
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीसाठी शरद पवार उतरणार रणांगणात

By admin | Updated: January 1, 2017 00:00 IST

राष्ट्रवादीसाठी शरद पवार उतरणार रणांगणात

नाशिक : जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच पदाधिकारी एका पाठोपाठ कायदेशीर चौकटीत अडकत असताना सैरभैर झालेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे डॅमेज कंट्रोल सावरण्यासाठी स्वत: पक्षाध्यक्ष माजी केंद्रीयमंत्री शरद पवार नाशिकला येणार आहेत. जिल्हा परिषदेत सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीसमोर सत्तेत टिकण्याचे प्रमुख आव्हान आहे. शनिवारी (दि.३१) यासंदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. बैठकीत ५ जानेवारीला शरद पवार यांच्या उपस्थितीत पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात हा शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून इच्छुक असलेल्यांनाही बोलविण्यात आले असून, मेळाव्यानंतर प्रमुख नेत्यांशी शरद पवार चर्चा करणार असल्याचे समजते. ४ जानेवारीलाच शरद पवार नाशिक मुक्कामी येत असून, त्यात आगामी महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकांबाबत प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे समजते. माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांनी जिल्ह्णात राष्ट्रवादीच्या ताब्यात महत्त्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्था व सहकारी संस्था कशा राहतील, हे पाहिले होते. मात्र त्यांना व माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक झाल्यानंतर काही महिन्यांपासून राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये काहीसे वातावरण सैरभैर झाले होते. त्यातच काही दिवसांपूर्वी माजी खासदार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती देवीदास पिंगळे, शहर कार्याध्यक्ष छबू नागरे, रामराव पाटील यांनाही अटक झाल्यानंतर राष्ट्रवादीची प्रतिमा मलीन झाल्याचे बोलले जात होते. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे सर्वाधिक २७ सदस्य असून, अध्यक्ष-उपाध्यक्ष पदही राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे. मात्र काही दिवसांपूर्वीच झालेल्या नगरपालिका निवडणुकांमध्ये चार ठिकाणी नगराध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादीला मोठा फटका बसल्याने राष्ट्रवादीची विस्कटलेली घडी बसविण्यासाठी आता शरद पवार स्वत: लक्ष घालणार असल्याचे बोलले जाते. पिंपळगाव बसवंत शेतकरी मेळाव्याच्या निमित्ताने शरद पवार आगामी निवडणुकांचे  रणशिंग फुंकणार आहे.
(प्रतिनिधी)