शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

सावानाच्या विविध समित्या कागदावरच

By admin | Updated: October 18, 2014 00:48 IST

सदस्य अनभिज्ञ : बैठकाच नसल्याचे स्पष्ट

नाशिक : सार्वजनिक वाचनालयाच्या कामकाजासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या केवळ कागदोपत्री व दिखावाच असून, गेल्या दोन ते चार वर्षांत या समित्यांची एकही बैठक घेण्यात आलेली नसल्याचे माहिती अधिकारान्वये उघडकीस आले आहे. घटनेतील तरतुदीनुसार कार्यकारी मंडळाने दर पाच वर्षांनी पाच सभासदांचे सल्लागार मंडळ निवडले पाहिजे आणि या मंडळाची वर्षातून किमान एक सभा होणे आवश्यक आहे. सल्लागार मंडळाने केलेल्या सूचना या कार्यकारी मंडळाच्या सभेत विचारार्थ मांडण्यात येतात व त्यानुसार कामकाजाची दिशा ठरविली जाते. त्यानुसार मार्च २०१२ मध्ये १३ मान्यवर सभासदांची समिती स्थापन करण्यात आली तसेच सावानाने सांस्कृतिक कार्य, वस्तू संग्रहालय, ग्रंथालयशास्त्र संशोधन, गंगापूररोड शाखा समिती, अर्थ, अभ्यासिका, नाट्यगृह, बालभवन, पुस्तक मित्रमंडळ आणि कायदेशीर सल्लागार अशा तब्बल बारा समित्यांची स्थापना केली. या समित्यांवर शहरातील मान्यवरांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला. या समित्यांच्या कामकाजाबाबत वाचनालयाचे आजीव सभासद हेमंत देवरे यांनी माहितीच्या अधिकारान्वये माहिती विचारली असता वाचनालयाने गेल्या दोन ते चार वर्षांत या समित्यांची एकही बैठक घेतली नसल्याचे उघडकीस आले आहे. याचाच अर्थ वाचनालयाने केवळ अहवालापुरतीच या समित्यांची स्थापना केल्याचे स्पष्ट होते. दरम्यान, ज्या समित्यांवर मान्यवरांच्या नियुक्त्या करण्यात आल्या त्यातील अनेकांना त्याची माहितीच नसल्याचा दावा देवरे यांनी केला आहे.