शहरं
Join us  
Trending Stories
1
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
2
"ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
3
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
4
'आम्ही नरेंद्र मोदींचं तुतारी वाजवून स्वागत करू', पुण्यातील सभेवरून सुप्रिया सुळे यांचा टोला
5
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
6
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
7
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
8
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
9
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
10
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
11
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
12
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
13
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
14
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
15
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
16
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
17
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
18
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
19
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
20
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

ओझर ग्रामपंचायतकडून मोकाट श्वानांचा बंदोबस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 3:20 PM

ओझर : गावातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याचे काम ग्रामपंचायतीने सुरू केले आहे. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.

ओझर : गावातील मोकाट श्वानांचा बंदोबस्त करण्याचे काम ग्रामपंचायतीने सुरू केले आहे. यामुळे नागरिकांचा त्रास कमी होणार आहे.  गावातील मोकाट श्वानांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या ही ओझरकरांची डोकेदुखी झाली होती. इतर ठिकाणची कुत्री पकडून मुंबई-आग्रा महामार्गावर रात्री आणून सोडली जातात. त्यामुळे भटक्या श्वानांची संख्या प्रचंड वाढली आहे. यामुळे रस्त्याने चालणेदेखील कठीण झाले आहे. या श्वानांनी काही मुले व नागरिकांना चावा घेऊन जखमी केले होते. यामुळे प्रत्येक ग्रामसभेत भटक्या श्वानांच्या समस्येवर उपाय करावा, अशी मागणी केली जात होती. यावर उपाय म्हणून ग्रामपंचायतीने बीड जिल्ह्यातील डॉ. हनुमंत शेळके यांच्या युनिव्हर्सल अ‍ॅनिमल वेल्फेयर संघटनेला भटकी श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण करण्याचे काम दिले. ते दिवसाला साधारणत: २० श्वान पकडून त्यांचे निर्बीजीकरण करून त्यांना दोन दिवस ठेवतात. यानंतर त्यांना अँटी रेबीज लस देऊन पुन्हा सोडले जाते. या कामी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. पवार हे सहाय्य करीत आहेत. यासाठी ग्रामपंचायतीने गावाबाहेर एक पत्र्याचे शेड बांधून दिले आहे. यामुळे श्वानांची संख्या नियंत्रणात राहील, अशी अपेक्षा आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :Nashikनाशिक