शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सारूळच्या दगड खाणीवर छापा

By admin | Updated: January 25, 2016 23:05 IST

जेसीबी, पोकलॅण्ड जप्त : महसूल विभागाची कारवाई

नाशिक : तालुक्यातील सारूळ येथील डोंगरांमध्ये भूसुरूंगाचे स्फोट घडवून दगडांचे उत्खनन व बेकायदेशीर क्रशर चालविणाऱ्या खाणीवर महसूल विभागाने अचानक छापा मारून कारवाई केली. या ठिकाणी दोन पोकलॅण्ड, जेसीबी व पाच मालट्रक यांसह भूसुरूंगाचे स्फोट घडविणारे यंत्र ताब्यात घेण्यात आले असून, वाडीवऱ्हे पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील सारूळ, राजूर बहुला, विल्होळी, रायगडनगर आदि ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर क्रशर चालविले जात असून, क्रशरचालकांनी थेट डोंगरांनाच लक्ष्य करून भगदाडे पाडली आहेत. गेल्या वर्षी याच खाणींमध्ये जेसीबी उलटून एक मजूर ठार झाल्याच्या घटनेनंतर महसूल विभागाने धडक कारवाई मोहीम हाती घेत सर्व क्रशर तसेच खाण मालकांवर गुन्हे दाखल केले होते. विशेष म्हणजे बेकायदेशीरपणे चालणाऱ्या या खाणींना वीज कंपनीकडून रीतसर वीजपुरवठाही करण्यात आल्याची बाब उघडकीस आली होती व त्यानंतर वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. कालांतराने मात्र पुन्हा बेकायदा क्रशर सुरू करण्यात आले असून, त्याबाबतची खबर शनिवारी महसूल खात्याला लागताच अपर जिल्हाधिकारी कान्हुराज बगाटे, प्रभारी गौण खनिज अधिकारी गणेश राठोड, प्रांत अधिकारी मंजू लक्ष्मी, तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी सर्व्हे नंबर ३६/२ या भरत नवले यांच्या मालकीच्या जागेवर अचानक छापा मारला. महसूलचे पथक येताच खाणीत भूसुरूंगाचे स्फोट घडविणारे तसेच पोकलॅण्ड व जेसीबीच्या चालकांनी घटनास्थळाहून धूम ठोकली. सारूळ व परिसरातील डोंगरांमध्ये भूसुरूंगाचे स्फोट घडवून दगडाचे उत्खनन केले जात आहे व याच ठिकाणी क्रशर चालवून खडी तयार केली जाते. घटनास्थळी दोन पोकलॅण्ड, दोन जेसीबी, पाच मालट्रक व स्फोट घडविणारे यंत्र सापडले. या घटनेनंतर वाडीवऱ्हे पोलिसांना खबर देण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात आला.