रेल्वे उड्डाणपुलावरून सर्रास वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 11:53 PM2019-07-28T23:53:01+5:302019-07-28T23:53:26+5:30

येथील रेल्वे फाटकावर झालेल्या नवीन उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. परंतु परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी तसेच दुचाकी वाहकांनी पुलावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र अद्याप चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झालेली नाही .

 Serious traffic starts from Railway Airport | रेल्वे उड्डाणपुलावरून सर्रास वाहतूक सुरू

रेल्वे उड्डाणपुलावरून सर्रास वाहतूक सुरू

Next

भगूर : येथील रेल्वे फाटकावर झालेल्या नवीन उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाल्याने उद्घाटनाची प्रतीक्षा आहे. परंतु परिसरातील नागरिक व शालेय विद्यार्थी तसेच दुचाकी वाहकांनी पुलावरून वाहतूक सुरू केली आहे. मात्र अद्याप चारचाकी वाहनांची वाहतूक सुरू झालेली नाही .
उड्डाणपुलाचे काम पूर्ण होऊन फक्त पथदीप यंत्रणा उभी करणे बाकी आहे. तसेच पुलाचे नाव काय द्यायचे, उद्घाटनास कोण आणायचे, कधी करायचे यामध्ये राजकीय पक्षांमध्ये चुरस लागलेली आहे. यात पथदीप बसविण्यास दिरंगाई होत आहे. याकडे नागरिकांनी दुर्लक्ष करून गेल्या दोन महिन्यांपासून सकाळी व्यायाम व फिरण्यासाठी या पुलाचा वापर सुरू केला आहे. तसेच शाळेचे विद्यार्थी पुलावरून जातात. भगूरसह १० गावांतील दळणवळण सुरू झाले आहे. तर चारचाकी वाहतूकदार उद्घाटनाची वाट पाहत असून, लवकरच न झाल्यास त्याची वाहतूक केव्हाही सुरू होण्याची शक्यता आहे.

Web Title:  Serious traffic starts from Railway Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.