शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पुन्हा मैदानात, आंतरवालीत ३० मे पासून आंदोलनाची घोषणा
2
Abu Bilal ISIS leader killed : मोठी कारवाई! अमेरिकेने आयसिसचा नंबर २ चा नेता उडवला; नायजेरियाच्या जंगलात अबू बिलालचा खात्मा
3
स्वतःचे कोचिंग सेंटर सुपरहिट करण्यासाठी कुलकर्णीने लीक केला NEETचा पेपर; पण विद्यार्थ्याने एक चूक केली अन्..
4
Hantavirus माणसाच्या शरीरात किती काळ राहतो? वैज्ञानिकांनाही मिळेना उत्तर; संशोधन सुरू
5
काम पूर्ण होण्याआधीच मुंबई-गोवा महामार्गावर टोल वसुली सुरू; खड्डे, सेवारस्ते आणि पुलांची कामे रखडलेलीच
6
पीएम मोदींच्या आवाहनानंतर परकीय चलन साठ्यात प्रचंड वाढ; सरकारी तिजोरीत आले ₹६०,००० कोटी
7
गाझामध्ये इस्रायलचा थरकाप उडवणारा एअर स्ट्राईक; हमासच्या सर्वात मोठ्या लष्करी कमांडरला केले टार्गेट
8
विमानात चिनी वस्तूंना नो एन्ट्री! ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी कठोर पाऊल; भेटवस्तूही डस्टबिनमध्ये फेकल्या
9
Mumbai Crime: पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी बोलावले, दारू पाजून गळा चिरला; अनैतिक संबंधांचा संशय,  फरार पतीला अटक
10
इंटरनेटवरही इराणचा टोल? समुद्राखालील ५००हून अधिक केबलमुळे डेटासेवा संकटात
11
जगभर: रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचं नवं रूप! शिक्षिकेसमोर झाले लीन
12
LPG बाबत चांगली बातमी आली समोर, काय आहेत लेटेस्ट दर? बुक करण्यापूर्वी जाणून घ्या
13
Petrol Diesel Price: पुढील ३-४ महिन्यांत पेट्रोल-डिझेलच्या किमती आणखी वाढणार? तज्ज्ञांचा महत्त्वाचा इशारा!
14
मुंबई-पुणे महामार्गावरील मिसिंग लिंकवर काही तासांत दोन भीषण अपघात; ३ ठार, अनेकजण जखमी!
15
LSG चा कर्णधार ऋषभ पंतवर बीसीसीआयची कारवाई; CSK विरुद्ध सामन्यात त्याच्याकडून झाली चूक!
16
"माझ्या दुःखाचे कारण माझी पत्नीच..." लग्नानंतर ९ वर्षांनी इंजिनिअरने संपवले जीवन, व्हॉट्सॲपवर ठेवला स्टेटस
17
१७ ते २३ मे : अडलेल्या कामांना गती देणारा काळ, फक्त घ्या 'ही' काळजी; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
18
कांदा १२.३५ रुपये किलो दराने खरेदी करणार, ३० जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा
19
'इराण अण्वस्त्रे बाळगू शकत नाही', ट्रम्प यांच्या भेटीनंतर शी जिनपिंग यांनी होर्मुझची सामुद्रधुनी खुली करण्यास सहमती दर्शवली
20
Gold Silver Price Today May 16: चांदी ₹२० हजारांपेक्षा अधिकनं घसरली, सोनंही धडाम, पाहा २४K, २२K, १८K गोल्डचा रेट
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ साहित्यिक गो. तु. पाटील यांचे निधन; त्यांच्या निधनाने एक व्यासंगी साहित्यिक व संपादक हरपला

By धनंजय वाखारे | Updated: August 19, 2024 00:00 IST

त्यांच्या निधनाने एक व्यासंगी साहित्यिक व संपादक हरपला आहे.

नाशिक : ज्येष्ठ साहित्यिक व अनुष्टुभ परिवारातील ज्येष्ठ संपादक गोविंदा तुकाराम तथा गो. तु. पाटील यांचे रविवारी (दि.१८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, सोमवारी (दि.१९) सकाळी ११ वाजता येवला येथील त्यांच्या कृतज्ञता निवासस्थानापासून निघणार आहे. त्यांच्या निधनाने एक व्यासंगी साहित्यिक व संपादक हरपला आहे.

त्यांच्या पश्चात मुलगा, सून व नातवंडे असा परिवार आहे. गो. तु. पाटील यांचे मूळगाव सूनसगाव खुर्द, ता.जामनेर असून, त्यांचे माध्यमिक शिक्षण कुऱ्हे पानाचे, ता. भुसावळ येथे बहिणीकडे झाले. त्यानंतर त्यांनी उच्चशिक्षण घेतले. याचवेळी नाशिक जिल्ह्यातील येवला येथे प्राध्यापक म्हणून ते रुजू झाले. तीच त्यांची कर्मभूमी झाली. नोकरी सांभाळतांनाच त्यांनी मराठी साहित्यातदेखील आपले कार्य सुरू केले. अनुष्टुभ सारखे दर्जेदार नियतकालिक त्यांनी चालविले.

त्याबरोबरच स्तंभलेखन, संपादन, मुलांसाठी संतचरित्र लिहिणारे गो. तु. पाटील यांनी वि. वा. शिरवाडकरांच्या हयातीत ’नटसम्राट समीक्षा’ या पुस्तकांचे संपादन केले आहे. ’ओल अंतरीची’ ही त्यांची आत्मकथा प्रसिद्ध आहे. चार दशके सांस्कृतिक विश्वात वावरणारे गो. तु. पाटील अजातशत्रू, व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जायचे. गेवराई (बीड), मालेगाव, येवला या ठिकाणी त्यांनी महाविद्यालयात अध्यापनाचे काम केले. विद्यार्थिप्रिय शिक्षक ही त्यांची ओळख असून, ते प्रगत विचारांचा सतत पाठपुरावा करीत राहिले.