शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

सेनेत पराभवाचे आत्मपरीक्षण

By admin | Updated: February 26, 2017 00:04 IST

पुत्रप्रेम कारणीभूत की अति आत्मविश्वास?

नाशिक : निवडणुकीपूर्वीच स्वबळावर सत्तेची भाषा करणाऱ्या सेनेचा वारू ३५ जागांवरच रोखला गेल्याने झालेल्या पराभवाच्या धक्क्यातून शिवसेना सावरण्याची चिन्हे तूर्त दिसत नसली तरी, हा पराभव कशामुळे झाला याचे आत्मपरीक्षण आता पक्षीय पातळीवर सुरू झाले आहे. उमेदवारी वाटपातील दोष या पराभवास कारणीभूत आहे की, निवडणुकीपूर्वी पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्वास नडला, असा प्रश्न सेना नेते एकमेकांना विचारू लागले आहेत.  महापालिका निवडणुकीपूर्वी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक होती. अन्य पक्षाच्या जवळपास दोन डझन नगरसेवकांनी निवडणुकीच्या तोंडावर प्रवेश केल्याने सेनेची तशी संख्या ४६ नगरसेवकांपर्यंत पोहोचली होती. अशातच अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही शिवबंधन बांधल्याने पक्षाची ताकद नको तितकी वाढल्याचा साक्षात्कार स्थानिक नेत्यांना झाल्यामुळे महापालिका निवडणुकीत शिवसेना एक हाती सत्ता ताब्यात घेण्याचा आत्मविश्वास वाढीस लागला. परिणामी उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी होऊन बंडखोरी तर झालीच, परंतु पक्षाच्या नेत्यांनीच आपापल्या नातेवाइकांसाठी उमेदवारीचा आग्रह धरल्याने उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या क्षणापर्यंत सेनेत गोंधळ सुरू होता. याचा फटका पक्षाला बसल्याचा अंदाज काढला जात आहे. याशिवाय पक्षात ऐनवेळी आलेल्यांना उमेदवारी देत निष्ठावंतांना डावलण्यात आल्यामुळे नाराजी पक्षाला भोवली काय? या पातळीवरही विचार सुरू आहे. मुळात नाशिकमध्ये सेनेला सत्तेची आशा निवडणुकीपूर्वीच लागून होती. दर दिवसाआड मातोश्रीवर पक्षप्रवेश झाल्यामुळे सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिकचा विजय गृहीत धरला व त्या हेतूनेच उद्धव ठाकरे यांची अंतिम टप्प्यात जाहीर सभेचे आयोजन करून वातावरण निर्मितीत भर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. परंतु ही सभाही चमत्कार करू शकली नाही. दरम्यान, पक्षानेदेखील नाशकातील सेनेचा पराभव गांभीर्याने घेतला आहे.