गुंगी आणणारं पाणी पाजून लैंगिक अत्याचार; नाशकातील स्वयंघोषित ‘कॅप्टन’ ज्योतिषी अशोक खरातला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 12:48 IST2026-03-18T12:47:48+5:302026-03-18T12:48:39+5:30

स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून, मंत्र-तंत्राच्या नावाखाली संमोहन करत पिडित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत तातडीने गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्याचे आदेश दिले होते.

Self-proclaimed 'Captain' astrologer Ashok Kharat arrested; Nashik police take action against him for raping victim by giving him dirty water | गुंगी आणणारं पाणी पाजून लैंगिक अत्याचार; नाशकातील स्वयंघोषित ‘कॅप्टन’ ज्योतिषी अशोक खरातला बेड्या

गुंगी आणणारं पाणी पाजून लैंगिक अत्याचार; नाशकातील स्वयंघोषित ‘कॅप्टन’ ज्योतिषी अशोक खरातला बेड्या

अझहर शेख  

नाशिक : भोंदूगिरी करणारा स्वयंघोषित कॅप्टन ज्योतिषी संशयित आरोपी अशोककुमार एकनाथ  खरात यास पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. एका पिडित महिलेने त्याच्याविरुद्ध सरकारवाडा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या लैंगिक अत्याचाराच्या तक्रारीवरून बलात्काराचा गुन्हा दाखल खरातविरुद्ध नोंदवून मध्यरात्री उशीरा पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. 

स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून, मंत्र-तंत्राच्या नावाखाली संमोहन करत पिडित महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेत तातडीने गुन्हा दाखल करून संशयिताला अटक करण्याचे आदेश दिले होते. यानुसार गुन्हे शाखेने मध्यरात्री खरातचा माग काढून त्यास बेड्या ठोकल्या आहेत. दरम्यान, या घटनेने शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. 

 नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत कॅनडा कॉर्नर येथील एका इमारतीमध्ये कार्यालयात घडला असल्याचे पिडित महिलेने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. संशयित आरोपी अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी असून तो ज्योतिषशास्त्र आणि ‘कॉस्मोलॉजी’चा अभ्यासक असल्याचा भासवत होता. त्याने फिर्यादी महिलेचा भावनिक,धार्मिक   विश्वास संपादन केला, त्यानंतर पीडितेला मंत्र-तंत्राच्या विधीसाठी कार्यालयात बोलावून तिला गुंगीकारक पदार्थ मिश्रित पाणी पाजले संमोहित अवस्थेत असताना पिडिता गेल्यनंतर तिला तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि तीच आयुष्य उद्धवस्त करण्याची धमकी देऊन संशयित खरात याने तिच्यावर वारंवार अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

   सरकारवाडा पोलिस ठाण्यात फिर्यादीवरून भारतीय न्याय संहिता बीएनएस कलम ६४(१), ७४, ३५२, ३५१(१) सह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत खरातविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title : स्वयंभू 'कैप्टन' ज्योतिषी अशोक खरात बलात्कार के आरोप में गिरफ्तार

Web Summary : स्वयंभू ज्योतिषी अशोक खरात को नासिक में एक महिला से बलात्कार के आरोप में गिरफ्तार किया गया। आरोप है कि उसने महिला को नशीला पदार्थ पिलाकर उसके साथ बलात्कार किया। उसने महिला की धार्मिक भावनाओं का फायदा उठाया और नवंबर 2022 से दिसंबर 2025 के बीच यह घिनौना अपराध किया। पुलिस ने मामला दर्ज कर लिया है।

Web Title : Self-proclaimed 'Captain' Astrologer Ashok Kharat Arrested for Rape

Web Summary : Ashok Kharat, a self-proclaimed astrologer, was arrested in Nashik for allegedly raping a woman after drugging her. He exploited her religious beliefs, administering a sedative before the assaults, which occurred between November 2022 and December 2025. Police have registered a case against him under relevant laws.