मनोरुग्ण युवतीची स्वत:ला जाळून घेत आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2018 16:49 IST2018-09-24T16:46:25+5:302018-09-24T16:49:56+5:30
नाशिक : सव्वीस वर्षीय मनोरूग्ण युवतीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़२४) पहाटेच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील सुफी शाळेजवळ घडली़ कीर्ती लक्ष्मण कट्यारे (रा. पंचरत्न रो-हाऊस, सुफी शाळेजवळ, इंदिरानगर) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.

मनोरुग्ण युवतीची स्वत:ला जाळून घेत आत्महत्या
नाशिक : सव्वीस वर्षीय मनोरूग्ण युवतीने स्वत:ला जाळून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (दि़२४) पहाटेच्या सुमारास इंदिरानगर परिसरातील सुफी शाळेजवळ घडली़ कीर्ती लक्ष्मण कट्यारे (रा. पंचरत्न रो-हाऊस, सुफी शाळेजवळ, इंदिरानगर) असे मृत्यू झालेल्या युवतीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काही महिन्यांपासून किर्ती कट्यारे या तरुणीवर मानसोपचार तज्ज्ञांकडून उपचार सुरू होते़ तसेच घरात ती पडल्याने तिला दुखापतही झाली होती़ सोमवारी रात्रीच्या सुमारास तिचे आई-वडील भाऊ, बहिण हे झोपलेले होते़ पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास मानसिक संतुलन ढासळलेल्या किर्तीने स्वत:च्या अंगावर रॉकेल ओतून घेत जाळून घेतले़ यामध्ये ८० ते ९० टक्के भाजल्याने गंभीर जखमी झालेल्या किर्तीला तिची बहिण सपना हिने पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले़
जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास किर्ती कट्याने हिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषीत केले़ दरम्यान, या घटनेची इंदिरानगर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़